Jalgaon News: 'निवडणूक संपताच लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या का?', 80 लाख महिला अपात्र, रोहिणी खडसे भडकल्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Rohini Khadse On Ladki Bahin Yojana

मंगेश जोशी, प्रतिनिधी 

Rohini Khadse On Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरात 2 कोटी 46 लाख पेक्षा जास्त महिलांनी नोंद केली होती.मात्र ई-केवायसी,उत्पन्न मर्यादा आणि इतर निकषांच्या अंमलबजावणीनंतर पात्र लाभार्थी महिलांची संख्या घटून 1 कोटी 66 लाखांवर आली आहे. 

लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ पोहोचावा यासाठी राज्य सरकारने या योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न यासह इतर पात्रता व अटी या निश्चित केल्या होत्या व या अटींची पूर्तता करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती.या निकषात न बसणाऱ्या महिला या अपात्र ठरल्या तर काही महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने मोठ्या संख्येने या योजनेतील महिलांना वगळण्यात आले.त्यामुळे आता या योजनेत जवळपास 80 लाख महिला अपात्र ठरल्या असून यावरूनच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सरकारला प्रश्न उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: भीमाशंकर मंदिर कधीपर्यंत बंद राहणार? पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी आता दिली मोठी अपडेट

'सरकारला आता लाडक्या बहिणींचा भार वाटू लागला आहे का?'

2024 च्या निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मोठ्या प्रमाणात महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला. मात्र निवडणुका संपताच लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न हा सुरू झाल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला असून सरकारला आता लाडक्या बहिणींचा भार वाटू लागला आहे का?की निवडणूक संपल्यानंतर बहिणींची गरज संपली?असा प्रश्न रोहिणी खडसे यांनी सरकारवर उपस्थित केला असून वाढत्या महागाईच्या काळात सरकारकडून महिलांना दिलासा देण्याऐवजी महिलांवर अन्याय केला जात असल्याचा आरोपही रोहिणी खडसे यांनी केला आहे. 

नक्की वाचा >> Pune News: भीमाशंकर मंदिर कधीपर्यंत बंद राहणार? पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी आता दिली मोठी अपडेट

एकीकडे सरकार मोठमोठ्या जाहिराती टेंडर व परदेश दौऱ्यांवर कोट्यावधी रुपये खर्च करत असताना गोरगरीब महिलांना मिळणारे 1500 रुपये सरकारच्या डोळ्यात खुपत असल्याचा हल्लाबोल करत ह्याच लाडक्या बहिणी सरकारला जागा दाखवतील असा गंभीर इशाराही रोहिणी खडसे यांनी सरकारला दिला आहे.दरम्यान या मुद्द्यावरून विरोधकांना सरकारला घेरण्यासाठी आयती संधी मिळाली असून पुढील काळात याच मुद्द्यावरून राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.