Vikas Lawande News: वारकरी सांप्रदायामध्ये प्रतिगामींची घुसखोरी वाढली असून त्यामुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत आहे, असे मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी थेट वारकरी संप्रदायातील २० घुसेखारांची नावेच जाहीर केली. यावरुनच आता नवा वाद उभा राहू लागला आहे. या यादीमध्ये अनेक संत महंतांची नावे असल्याने हा वारकरी सांप्रदायाचा अपमान असल्याचे सांगत हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत.
भाजपच्या तुषार भोसलेंची जोरदार टीका
विकास लवंडे यांनी जाहीर केलेल्या वारकरी सांप्रदायामधील घुसखोरींच्या यादीवरुन आचार्य तुषार भोसलेंनी जोरदार टीका केली आहे. "विनाकारण आमच्या मोठ्या संतांना आणि महात्म्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र शरद पवार रचत आहेत पण मला एकच सांगायचयं की अशा 'उपटसुंब' आणि 'तीनपाट' लोकांना उत्तर द्यायला मी रिकामा नाही. शरद पवारांनी स्वतः समोर यावं आणि वन टू वन चर्चा करावी, त्यांना मी उत्तर देईन. या फालतू लोकांना पुढे करून पाठीमागून वार करण्याचे प्रयत्न करु नये", असं थेट आव्हान त्यांनी शरद पवार यांना दिलं आहे.
शिवसेना आमदाराकडून अटकेची मागणी
दुसरीकडे, विकास लवांडे यांनी साधुसंता विषयी अपशब्द वापरल्याबद्दल सकल हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना आमदार विठ्ठलराव लांघे पाटील यांनी केली आहे. याबाबत नेवासा तालुका सकल हिंदू समाज व देवगड भक्त परिवाराच्या वतीने नेवासा पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
"महाराष्ट्रातील २० हून अधिक संत महंत यांना घुसखोर म्हणून जाहीर पत्रकार परिषद व सोशल मीडियाद्वारे संबोधणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विकास लवांडे नामक भीतीने साधुसंता विषयी अपशब्द वापरल्याबद्दल सकल हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. याबाबत नेवासा तालुक्यासह पूर्ण महाराष्ट्राला पूजनीय असणाऱ्या देवगड देवस्थानचे पूजनीय भास्करगिरी बाबा यांच्याबद्दल व इतर १९ संत महंत यांच्याबद्दल कोणताही विचार न करता, कागदोपत्री पुरावा न देता, कोणत्याही सक्षम न्यायालयांचे निर्णय न घेता मनाला वाटेल तसे बोलण्याचा अधिकार म्हणून समाजाचे सामाजिक स्वास्थ्य खराब होऊन कायद्याचा प्रश्न निर्माण होईल असे वक्तव्य या नालायक विकास लवांडे याने केले आहे, अशा शब्दात आमदार लांघे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.
Lok Sabha News: लोकसभेत महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक फेटाळले; इतर दोन विधेयकांचं काय झालं?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world