CM Devendra Fadnavis: मुंबईचा भावी महापौर कोण? मराठी- अमराठी वादावर मुख्यमंत्र्यांचे मोठं विधान

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या 'बुरखेवाली महापौर' या मुद्द्यावरील मौनावर टीका केली. 'NDTV पॉवर प्ले'च्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

जाहिरात
Read Time: 3 mins

CM Devendra Fadnavis EXCLUSIVE:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा भावी महापौर कोण होणार? मराठी-अमराठी वाद आणि आगामी महापालिका निवडणुकीतील रणनीतीवर अत्यंत महत्त्वपू्र्ण भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेवर त्यांनी जोरदार निशाणा साधला. मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच असेल, असे स्पष्ट करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या 'बुरखेवाली महापौर' या मुद्द्यावरील मौनावर टीका केली. 'NDTV पॉवर प्ले'च्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या राजकारणातील अत्यंत संवेदनशील मुद्द्यांना हात घातला आहे. "उद्धव ठाकरेंना उत्तर भारतीय चालत नाहीत, पण बुरखेवाली महापौर चालते का?" असा बोचरा सवाल करत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या (UBT) बदलत्या भूमिकेवर हल्ला चढवला.

NDTV BMC Powerplay LIVE Updates: उद्धव ठाकरेंनी नवीन स्क्रिप्ट रायटर ठेवावा: CM देवेंद्र फडणवीस

मुंबईचा महापौर आणि मराठी अस्मिता

कृपाशंकर सिंह यांच्या मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल, या वक्तव्यारून मुंबईत त्सुनामी आली. उबाठाचे लोक उत्तर भारतीय जणू पाकिस्तानातून आले असे ओरडू लागले. मात्र त्यांचा पर्दाफाश झाला, जेव्हा एमआयएमच्या एका नेत्यांना म्हटलं की, मुंबईचा महापौर 'बुरखेवाली' बनेल. उत्तर भारतीय चालत नाही मग बुलखेवाली कशी चालेल असं मला वाटलं.  मात्र यावर ठाकरे गटाकडू कुणीच बोललं नाही. सकाळी 9 वाजता वाजणारे लाऊडस्पीकर देखील बोलले नाहीत.यानतंर त्यांचा खरा चेहरा समोर आला. त्यानंतर आम्ही बोललो मंबईत महायुती, हिंदू, मराठी महापौर असेल असं आम्ही म्हटलं तर यात गैर काय आहे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. 

एकनाथ शिंदेंच्या 'नाराजी'च्या चर्चा

एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जातात, त्यावरून होणाऱ्या नाराजीच्या चर्चांवर फडणवीस म्हणाले की,  " एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे खासदार आहेत आणि त्यांचा नातू दिल्लीत असतो. नातवाच्या प्रेमापोटी ते दिल्लीला गेले तरी नाराजीच्या चर्चा सुरू होतात. ते दिल्लीत अमित शाहांनाच भेटतात आणि मला त्याचा आनंदच आहे. ते जर इतर कोणत्या पक्षांच्या नेत्यांना भेटले तर मला चिंता वाटेल. एकनाथ शिंदे हे अत्यंत भावनिक व्यक्ती आहेत, त्यामुळे त्यांना हाताळणे सोपे जाते. याउलट उद्धव ठाकरे हे अनिश्चित आहेत, त्यामुळे त्यांना हाताळणे कठीण होते, असं देखीव देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

Advertisement

NDTV BMC Power Play: मुंबईमध्ये महायुती किती जागा जिंकणार? पियुष गोयल यांनी मोठा आकडा सांगितला

महापालिका निवडणुकीत विजयाचा विश्वास

विधानसभेपेक्षाही मोठे यश आम्हाला महापालिकेत मिळेल," असा दावा फडणवीस यांनी केला. याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, "विधानसभेच्या वेळी खरी शिवसेना कोणती यावरून शिवसेनेचा मतदार थोडा संभ्रमात होता, त्यामुळे आम्हाला जागा कमी मिळाल्या. मात्र आता खऱ्या शिवसेनेचा (एकनाथ शिंदे गट) मतदार पूर्णपणे तयार झाला आहे. यावेळी मतदारांमध्ये कोणताही संभ्रम नाही. तसेच भाजपचा मतदार कुठेही जात नाही."