जाहिरात

NDTV Conclave: 'सहकार चळवळीतून अर्थकारण गतीमान करणार', मंत्री बाबासाहेब पाटलांनी सांगितला प्लॅन!

NDTV Emerging Business Conclave: हे २०२५ वर्ष आपण सहकार वर्ष म्हणून घोषित केले. यामध्ये कुशल कामगार, युवकांना संधी अशा योजना आपण राबवल्या" असं बाबासाहेब पाटील म्हणाले. 

NDTV Conclave: 'सहकार चळवळीतून अर्थकारण गतीमान करणार', मंत्री बाबासाहेब पाटलांनी सांगितला प्लॅन!

 NDTV Emerging Business Conclave: महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी एनडीटीव्ही मराठीने 'इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्ह, मुंबई चॅप्टर' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपला सहभाग नोंदवला. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सहकार चळवळीतून देशाचे आणि राज्याचे अर्थकारण बदलण्याचा संकल्प व्यक्त केला, ज्याची रणनितीही सांगितली. 

काय म्हणाले बाबासाहेब पाटील?

"अमित शहांचे नेतृत्व हे सहकार क्षेत्रातूनच तयार झालेले आहे.  मार्केट कमिटीच्या सभापतीपासून गुजरात जिल्हा बँकेचे ते १० वर्ष चेअरमन झाले. त्यामुळे सहकार क्षेत्राचा आवाका काय आहे? ताकद काय आहे? हे अमित शाह यांना माहित होते. राज्यामधील ज्या काही विकास सेवा सोसायट्या आहेत.गृहनिर्माण सोसायट्या,  सुतगिरण्या, डेअऱ्या याला दिशा देण्याचे काम केले. हे २०२५ वर्ष आपण सहकार वर्ष म्हणून घोषित केले. यामध्ये कुशल कामगार, युवकांना संधी अशा योजना आपण राबवल्या" असं बाबासाहेब पाटील म्हणाले. 

NDTV Emerging Business: मुंबईत AI विद्यापीठ स्थापण करणार, आशिष शेलारांनी दिली माहिती

"या सहकार क्षेत्रामध्ये बँका, पतसंस्था, सुतगिरण्या काम करतात. बिहार राज्याला निसर्गाची मोठी देणगी आहे. तिथे मुबलक पाणी आहे. जमीन चांगली आहे. खनिज संपत्ती आहे. पण त्या राज्यातल्या लोकांनी सहकार क्षेत्राकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच त्या राज्यातील लोक आपल्याकडे येतात. त्यामुळे सहकार चळवळीची ताकद खूप मोठी आहे. त्यामुळे आपल्याला नवीन तरुणांना, तरुणींना काम द्यायचे आहे. देशाचे आणि राज्याचे अर्थकारण गतीमान करायचे आहे." असंही ते पुढे म्हणाले.

 "मागील काळखंडात विविध सोसायट्या फक्त कर्ज द्यायच्या आणि व्याज घ्यायची. मात्र पश्चिम महाराष्ट्रात ही सहकार चळवळ खूप मोठी झाली आहे. एखाद्या भागाचा विकास झाला म्हणजे काय? तर त्या भागातील सर्वसामान्य माणसाचे उत्पन्न वाढले तर त्याचा विकास झाला म्हणता येईल. सहकार चळवळ ही फक्त ग्रामीण भागासाठी नाही. सहकार क्षेत्र आणि शहरी भागाचा काय संबंध आहे हे लोकांना माहित नाही. मात्र गृहनिर्माण संस्थाचे काम सहकारातूनच चालते."

 "कोणत्याही विभागाला माणसे घेत असताना त्याचा बुध्यांक पाहिला पाहिजे. अगोदर त्या विषयाचे त्याला ज्ञान आहे का? तो फक्त आपला सोयरा आहे, जवळचा आहे  म्हणून जर नेमले तर तो त्या खुर्चीला न्याय देऊ शकत नाही. आपण जर असे म्हणालो की आपलाच आहे. आपल्याच भागातील आहे. त्या विभागात त्या योग्यतेचा माणूस घेतला तर त्याच्या निर्णयाने अनेक प्रश्न सुटू शकतात," असंही सहकार मंत्री यावेळी म्हणाले.

Emerging Business Conclave : मराठीचं शिक्षण देणाऱ्या APP ची निर्मिती करणार; भाषा वादावर उदय सामंतांचा उपाय

दरम्यान, "आपल्या पाल्याला कशात रस आहे ते पाहा. त्याच्या आवडी काय आहेत ते पाहा आणि त्याच्या पाठीमागे उभे राहा. केवळ डॉक्टर आणि इंजिनियर लोकच नाव कमावू शकतात असं नाही. कोणते क्षेत्र खराब आहे. खेळामध्ये सचिन तेंडूलकर, धोनीसारखे खेळाडू आहेत, त्यांनी नाव कमावले. संगितामध्येही अनेकजण आहेत. आपल्याला कुठे जायचे आहे ते आपण ठरवायला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com