NDTV Marathi Manch: एनडीटीव्ही मराठी मंच सोहळा! राजकारण ते उद्योगजगतातील दिग्गजांची मांदियाळी

NDTV Marathi Manch Conclave Guest List: एनडीटीव्ही मराठी मंच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये पार पडणाऱ्या या भव्यदिव्य कार्यक्रमाला राजकीय, मनोरंजन, पर्यटन उद्योग क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत. त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष आणि एनडीटीव्ही मराठीला झालेल्या  वर्षपूर्ती अशा विविध औचित्यांच्या निमित्ताने एनडीटीव्ही मराठी मंच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये पार पडणाऱ्या या भव्यदिव्य कार्यक्रमाला राजकीय, मनोरंजन, पर्यटन उद्योग क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावणार आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कसा असेल कार्यक्रम अन् कोण कोण लावणार हजेरी?

पहिल्या वहिल्या  NDTV मराठी मंचसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते विकास आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक सुप्रसिद्ध लोक आपले विचार मांडतील.

या कार्यक्रमाला नवा गडी नवे राज्य या विशेष कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच मंत्री झालेले शिवेंद्रसिंहराजे भोसले, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच मंत्री मेघना बोर्डीकर यांची उपस्थिती असेल. त्यासोबतच प्रदूषण नियामक मंडळाचे चेअरमन मंत्री सिद्धेश कदमही उपस्थित असतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शतकपूर्ती आणि महाराष्ट्र या कार्यक्रमात आरएसएस प्रचारप्रमुख सुनील आंबेडकर उपस्थित असतील.

त्यासोबतच वेगवान महाराष्ट्राचे रोडकरी म्हणजेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती असेल. लेट्स स्टार्टअप महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात चितळे उद्योगसमूहाचे प्रमुख इंद्रनील चितळे, एमएससी बँकेचे विद्याधर अनासकर चेअरमन तसेच सह्याद्री फर्मचे विलास शिंदे उपस्थित असतील. त्यासोबतच एआय आणि महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमासाठी मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती असेल.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Big News: चीनने अरुणाचल प्रदेशच्या 22 ठिकाणांची परस्पर बदलली नावं, मुख्यमंत्री म्हणतात हा तर...

त्यासोबतच वाढवण बंदर आणि विकासपर्व या कार्यक्रमात मंत्री नितेश राणे, विरोधकांच्या नजरेतला महाराष्ट्र या सदरात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, एक्सप्लोरिंग महाराष्ट्रमध्ये पर्यटन मंत्री इंद्रनील नाईक, केसरी टुर्सचे शैलेश पाटील तसेच कामत हॉटेल्सचे डायरेक्टर विशाल विठ्ठल कामत हे आपले विचार मांडतील. 

त्यासोबतच मनोरंजन क्षेत्रातून अभिनेत्री संयमी खेर, स्वस्थ महाराष्ट्र, सृदृढ महाराष्ट्रमध्ये डॉ. जगन्नाथ दिक्षीत आणि डॉ. विजय सुरवसे आरोग्यविषयक मार्गदर्शन करतील. 

NDTV Marathi Manch: एनडीटीव्ही मराठी मंच सोहळा: राजकारणासह उद्योग, पर्यटन क्षेत्रातील मान्यवर राहणार उपस्थित