जाहिरात

NDTV Marathi Manch: एनडीटीव्ही मराठी मंच सोहळा: राजकारणासह उद्योग, पर्यटन क्षेत्रातील मान्यवर राहणार उपस्थित

NDTV Marathi Manch Conclave: NDTV मराठी मंच च्या आयोजनाने या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्वाच्या व्यक्तींना त्यांचे विचार मांडण्याचे एक दमदार व्यासपीठ मिळणार आहे.

NDTV Marathi Manch: एनडीटीव्ही मराठी मंच सोहळा: राजकारणासह उद्योग, पर्यटन क्षेत्रातील मान्यवर राहणार उपस्थित

मुंबई:  NDTV मराठी पहिल्या वर्धापनीदिनाच्या औचित्याने महाराष्ट्राच्या प्रगतीचा लेखाजोखा आणि भविष्यातील विकासाचा आराखडा राज्यासमोर मांडणारे एक हक्काचे व्यासपीठ मिळावे याउद्देशानं तयार झालेल्या 'NDTV मराठी मंच'ची घोषणा करताना NDTV समूहाला अत्यंत आनंद होत आहे. आज 23 एप्रिल 2025,रोजी मुंबईत 'Unstoppeble Maharashtra' च्या पायावर आधारित ही विचार मंथनाची एक नवी सुरुवात होणार आहे. पहिल्या वहिल्या 'NDTV मराठी मंच'वर राज्यातल्या सर्वात ताकदवान आवाजांचा समावेश असेल..हा आवाज राज्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा,विकासाचा, दुर्दम्य इच्छाशक्तीचा, संशोधनाचा असेल. यावर्षी राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाचे शताब्दीपूर्ती वर्ष आहे. महाराष्ट्र राज्यसरकाराच्या कामकाजाचे 100 दिवसही पूर्ण होतायत. NDTV मराठी मंच च्या आयोजनाने या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्वाच्या व्यक्तींना त्यांचे विचार मांडण्याचे एक दमदार व्यासपीठ मिळणार आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाराष्ट्रातील विवेकी नेतृत्वासाठी त्यांचा विकासाचा अजेंडा सांगण्याचा NDTV मराठी मंच हे सर्वोत्तम व्यासपीठ असेल. या व्यासपीठावर दिवसभर भरगच्च कार्यक्रम असतील. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, राजकीय महत्व,आर्थिक ताकद आणि सामजिक वीण हे सारं काही अधोरेखित होईल असा एकमेव मंच असेल NDTV मराठी मंच.त्याचसोबत समाज जीवनातील महत्वाच्या व्यक्तींच्या प्रवासातील अडथळे, त्यांना आलेलं अपयश, त्यातून उभारी घेऊन त्यांनी गाठलेला यशाचा सर्वोच्च बिंदू अशा अनेक प्रेरणादायी कहाण्याही मंचावरुन महाराष्ट्राला ऐकायला मिळतील.

पहिल्या वहिल्या  NDTV मराठी मंचसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते विकास आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक सुप्रसिद्ध लोक आपले विचार मांडतील.

ट्रेंडिंग बातमी - Big News: चीनने अरुणाचल प्रदेशच्या 22 ठिकाणांची परस्पर बदलली नावं, मुख्यमंत्री म्हणतात हा तर...

NDTV मराठी मंच 2025 वर अनेक महत्वाच्या व्यक्तींची चर्चासत्र आणि मुलाखती असतील. NDTV मराठी मंचवर होणाऱ्या विचारमंथानातून महाराष्ट्राच्या प्रगतीचा भविष्यातील मार्ग प्रशस्त करण्याचा आमचा प्रयत्न असेल. NDTV मराठी मंचावरुन आजच्या विषयांवर प्रकाश टाकला जाईल.पर्यावरणीय बदल, डिजीटल विश्वातली अनोखी संशोधनं, ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली आणि महाराष्ट्राची वेगानं बदलणारी ओळख या आणि अशा महाराष्ट्रातील घराघरांवर थेट परिणाम करणाऱ्या
प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न होईल. या मंचावर होणाऱ्या वैचारिक घुसळणीच्या माध्यमातून NDTV मराठी आपल्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रेक्षकांशी वर्षभरात तयार झालेलं घट्ट नातं मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.NDTV मराठी मंच हा त्याच प्रयत्नांच्या मालिकेतील महत्वाचं पुष्प असणार आहे.

 याशिवाय महाराष्ट्रातील स्टार्टअप इको सिस्टिमच्या धांडोळा घेण्याचा 'NDTV मराठी मंच'मधून प्रयत्न होईल.महाराष्ट्रातील उद्योजक आणि होतकरु तरुण तरुणींच्या भेटीगाठींसाठी ही उत्तम संधी ठरणार आहे.मंचावर होणारा संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या विकसीत भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्र  भूमिका प्रभावीपणे कशी बाजवेल याचाही शोध घेण्याचा प्रयत्न करेल.  

वर्षभरापूर्वी NDTV मराठीने प्रेक्षकांचा आवाज बनण्याचं वचन महाराष्ट्राला दिले. हे वचन आजपर्यंत आमच्या कामातून प्रत्येकवेळी प्रतिबिंबित करत आलो आहोत. NDTV मराठी मंच 2025 मधून तेच वचन पुन्हा एकदा अधोरेखीत करुन महाराष्ट्राच्या विकासाप्रती कटीबद्ध राहाण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ट्रेंडिंग बातमी - Cabinet meeting: मत्स्य व्यवसायाला "कृषीचा दर्जा", कॅबिनेटचा मोठा निर्णय, 'हे' मिळणार फायदे