मुंबई: कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या चालवल्या तरी आमचा समन्वय चांगला आहे. एकमेकांना सोबत घेऊन आम्ही काम करत आहोत. कोणासाठीही पॉलिटीकल स्पेस राहणार नाही.. असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात विरोधकांना राजकारणात स्पेसच ठेवणार नाही.. असे विधान केले. एनडीटीव्ही मराठी मंच या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यात सुरु असलेल्या ठाकरे- पवार फॅमिलीच्या मनोमिलनावर मोठे विधान केले.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
"कुठलेही परिवार एकत्र येत असतील तर त्याची आम्हाला अडचण नाही. आम्ही त्यांचे स्वागत करु. 'माध्यमे फार जास्त ऐकतात, फार जास्त विचार करतात आणि फार जास्त विश्लेषण काढतात. माध्यमे फार पुढचा विचार करतो. आत्तातरी मी स्पष्टपणे सांगतो आत्तातरी अशा प्रकारच्या रिअलायमेंटची कुठलीही परिस्थिती दिसत नाही. अर्थात साद आणि प्रतिसाद ज्यांनी दिलाय ते याबद्दल अधिक सांगू शकतील.. मी याबद्दल आत्मविश्वासू नाही..' असे महत्वाचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
तसेच 'आम्ही तिघेही एकमेकांना कॉम्लिमेंट करतो. आम्ही तिघेही डायव्हर्स स्वभावाचे आहोत. कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या चालवल्या तरी आमचा समन्वय चांगला आहे. एकमेकांना सोबत घेऊन आम्ही काम करत आहोत. कोणासाठीही पॉलिटीकल स्पेस राहणार नाही, आम्ही तिघे मिळून सर्व सगळी राजकीय स्पेस व्यापून टाकणार आहोत. त्यामुळे कोणाकरिता काही स्पेस राहणार नाही..' असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
NDTV Marathi Manch: 'राज्यातील तपासणी लॅबबाबत कडक कायदा..' आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मोठी घोषणा
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील त्यांच्या राजकीय वाटचालीबद्दल महत्वाचे विधान केले. 'देवेंद्र फडणवीस हा भारतीय जनता पक्षाचा एक सैनिक आहे. त्याला जिथे सांगेत तिथे तो काम करतो. महाराष्ट्रात काम करताना मला अतिशय आनंद आहे. ज्यादिवशी पक्ष सांगेल त्यादिवशी मी दिल्लीत काम करेन. ज्यादिवशी पक्ष सांगेल फार झालं तुमचं आता घरी जा, त्यादिवशी मी नागपूरच्या घरी जाऊन बसेन..' असे विधान त्यांनी केले.
(नक्की वाचा- 'कोणासाठीही पॉलिटिकल स्पेस..', CM फडणवीसांच्या विधानाने विरोधकांची धाकधुक वाढणार!)