अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
NEET UG Paper Leak Pune Connection: NEET पेपर फुटी प्रकरण सध्या देशभर गाजत आहे. राजस्थानपासून महाराष्ट्रातील नाशिक, पुण्यापर्यंत या पेपर फुटी प्रकरणाचे कनेक्शन जोडले गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मनिषा वाघमारेला सीबीआयने अटक केली आहे. पोलिसांनी मनीषा वाघमारेचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले असून याप्रकरणात तिचा मुख्य रोल असल्याचेही उघड झाले आहे.
ब्युटी पार्लर चालवणारी मनिषा कशी झाली पेपर फुटी रॅकेटची सुत्रधार?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सुख सागर नगर येथे राहणारी मनीषा वाघमारे एक ब्युटी पार्लर चालवत होती, परंतु गेल्या दोन वर्षांपासून ती नीट पेपरफुटी रॅकेटमध्ये मध्यस्थ म्हणून काम करत होती. मनीषा वाघमारे विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना धनंजय लोखंडे यांच्याशी जोडून देत असे. ती नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्याकडून पैसे गोळा करून नंतर त्यांना आपल्या नेटवर्कशी जोडून देत असे आणि त्यातून कमिशन मिळवत असे. NEET पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांना ती शोधत असून त्यांच्याकडून पैसे घेऊन ती हे काम करत होती.
हे विद्यार्थी थेट धनंजय लोखंडे याला पुरवत असे म्हणजेच या सगळ्या प्रकरणी ही महिला मध्यस्थीचं काम करत होते. आपल्या मुलीला पास करण्यासाठी देखील अशाच प्रकारची मदत मनीषा वाघमारे हिने घेतल्याचा तपासात उघड झाले आहे. २ वर्षांपूर्वी सोशल मीडियावर वाघमारे हिला अशा जाहिराती दिसल्या, ज्यात इच्छुकांना स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मनिषा वाघमारेने आशा बाळगून ती मदत घेतली, पण त्या व्यक्तींनी त्यांची फसवणूक केल्यामुळे त्यांचे लाखो रुपये बुडाले होते असेही देखील समोर आल आहे.
या सगळ्या प्रकरणी मनीषा वाघमारे अनेक पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी संपर्क करून त्यांना या धनजय लोखंडेची ओळख करून देत होती. धनराज लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यात NEET पेपर फुटी प्रकरणी व्हॉट्सअँप वरून झालेले संवादही पोलिसांच्या हाती लागले आहेत. दरम्यान, मनीषा वाघमारे यांचे पती संजय वाघमारे हे देखील डॉक्टर असून त्यांचे पुण्यातील बिबेवाडी परिसरात डेंटल डिझाईन नावाचे रुग्णालय आहे. या ठिकाणी जवळपास 12 तास सीबीआयने धाड टाकून तपास केला असून सीसीटीव्ही देखील तपासले आहेत.