मेहबूब जमादार
गणेशोत्सव तोंडावर आहे. चाकरमानी कोकणात गणपतीला जाण्यासाठी तयारीला ही लागले आहेत. अनेकांची बुकींग ही झाली आहे. कुणी रेल्वेने तर कुणी पुणे कोल्हापूर मार्गे चाकरमानी कोकणातील आपलं गाव गाठतात. पण बरेचशे चाकरमानी हे मुंबई गोवा हायवेनेच जाणे पसंत करतात. हा हायवे यावर्षी गणेशोत्सवासाठी पूर्ण पणे तयार झाला असेल असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं. त्यामुळे कोकणवासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. पण सत्य काही वेगळच आहे. हा हायवे दिलेल्या तारखेला पूर्ण झालाच नाही. आता या हायवेची नवी डेडलाईन समोर आली आहे.
नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप
गेली 14 वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यासाठी आता नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. या महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे यांनी आज मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. रखडलेल्या कामाची कारणमीमांसा केली. अयोग्य ठेकेदार, भूसंपादनातील अडचणी आणि नैसर्गिक अडथळे यामुळे काम रखडलं ही वस्तुस्थिती आहे असं ते म्हणाले.
माणगाव आणि इंदापूर येथील बायपासची कामे वगळता महामार्गाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल, असं शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या वर्षीही कोकणवासीयांना मुंबई गोवा हायवेवरिल खड्डे अपूर्ण रस्ता यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. या हायवेसाठी वेळो वेळी नवी डेडलाईन देण्यात आली. तारीख पे तारीख या शिवाय काही झालं नाही. आता मे महिन्याची असणारी डेडलाईन थेट डिसेंबरपर्यंत गेली आहे. त्यामुळे रस्त्या मागे लागलेलं विघ्न संपण्याचं नाव घेत नाही असचं म्हणालं लागेल.