New guidelines for hotels from FDA Commissioner Tukaram Mundhe : अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटेलधारकांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. हे नियमांचं पालन करणं हॉटेल, रेस्टॉरंट आणि तत्सम आस्थापनांसाठी बंधनकारक असणार आहेत. लोकांच्या आरोग्यासाठी ही नियमावली जाहीर करण्यात आल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
अन्न आणि औषध प्रशासनाची नवी मोहीम...
एका पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. तुकाराम मुंढे यावेळी म्हणाले, 2011 पासून फूड सेफ्टीचे काही नियम आहेत. त्या कायद्याअंतर्गत मी काम करतो. अन्न पौष्टिक असावं आणि सुरक्षित असावं ही जबाबदारी आमच्या विभागाची असते. यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे हॉटेल आणि उपहारगृह. या आस्थापनांकडून कायद्याचं पालन होतं की नाही हे महत्त्वाचं आहे. २३ जून रोजी यासंदर्भात एक आदेश पारित करण्यात आला आहे. परवाने अनिवार्य आहेत. त्याचं पालन झालं आहे. अन्न तयार करणं, लेबलिंग, पॅकेजिंग याचे नियम आहेत. अंमलबजावणी गरजेजी आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने याबाबत कारवाई केली तेव्हा गंभीर त्रुटी आढळून आल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. साफसफाई नसणे, तेलाचा सारखा वापर करणं, तापमान नियंत्रणातील त्रुटी, सुरक्षित पाणी नसणं अशा बऱ्याच गोष्टी आढळून आल्या. त्यामुळे पुन्हा आदेश काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही मोहीम कायमस्वरुपी चालणार आहे.
हॉटेल-उपहारगृहांसाठी नवी नियमावली...
-
हॉटेल, उपहारगृह, कँटीन, ढाबे, क्लाउड किचन, रेस्टॉरंट यांना परवाने असणं महत्त्वाचं आहे.
- स्वच्छता आणि आरोग्याचे नियम पाळणे गरजेचे आहेत.
- कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे. अन्यथा संसर्ग होण्याची भीती असते.
- गरम व थंड अन्नसाठी तापमान नियंत्रणात ठेवणे
- ग्राहकांना मोफत आणि पिण्यायोग्य पाणी देणं अनिवार्य, यासाठी संबंधित बोर्ड लावले पाहिजेत.
- मेन्यू, लेबलिंग, मेन्यूमध्ये कॅलरी, nutrients आणि allergy ची माहिती देणं अनिवार्य
- FASSAI च्या Roko नियमांचं पालन करणं महत्वाचं
- वापरलेलं तेल हे डिस्पोज करावे.
- 50 कोटींच्या वर उत्पन्न असलेल्या आस्थापन्नांचं ऑडिट करणं महत्त्वाचं, अन्यथा दंडात्मक कारवाई होणार
किचन कसं असावं?
- भिंती आणि फरशांना टाईल्स असावेत.
- वॉशेबल असावे.
- चिमनी, आणि एग्जॉस्ट फॅन असणं महत्त्वाचं
- कच्चामाल ठेवण्यासाठी वेगळी मांडणी असणं अनिवार्य
- शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगळे ठेवणे अनिवार्य
- ग्राहकांसाठी हॅन्डटॉवल असणं महत्त्वाचं
- पेस्ट कंट्रोल करणं महत्त्वाचं
- इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवावे
- झुरळ, पाल किचनमध्ये नसली पाहिजे
- गरम जेवण म्हणजे 60 डिग्री असलं पाहिजे, थंड म्हणजे 4 डिग्री आणि फ्रोझन म्हणजे -18 डिग्री असलं पाहिजे.