जाहिरात

FDA's Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची मुंबईतील प्रसिद्ध नाश्त्यावर नजर; हॉटेल, उपहारगृहांचे धाबे दणाणले!

अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून तुकाराम मुंढे यांनी धाडसत्र सुरू केलं आहे.

FDA's Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची मुंबईतील प्रसिद्ध नाश्त्यावर नजर; हॉटेल, उपहारगृहांचे धाबे दणाणले!

FDA's Tukaram Mundhe : अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून तुकाराम मुंढे यांनी धाडसत्र सुरू केलं आहे. पाणीपुरीपासून ते तंबाखूपासून सर्वच स्तरावर तुकाराम मुंढे यांची नजर आहे. अनेकदा मुंबईसह महाराष्ट्रातील हॉटेल आणि फूड स्टॉलवर स्वच्छतेचे नियम पाळले जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. तुकाराम मुंढे यांनी याविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. तुकाराम मुंडे हे कडक शिस्तीने IAS अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते FDA च्या आयुक्तपदी आल्यापासून अनेकांचे धाबे दणाणले आहेत. 

इडली-वडा-डोसावर FDA ची करडी नजर...

आता मुंबईकरांचा आवडता नाश्ता इडली-वडा आणि डोसावर आता FDA ची करडी नजर आहे. तुकाराम मुंढे यांनी मुंबईत नवी मोहीम सुरू केली आहे.  मुंबईतील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, उपहरगृह यांच्यावर नजर ठेवणार आहेत.  या नियमांची अंमलबजावणी होते ही नाही याचा तपास करण्यात येणार आहे.  

नक्की वाचा - Beed News : बस्स नाम ही काफी है! तुकाराम मुंढेंची दहशत; दौऱ्याच्या चर्चेने दुकानदारांना भरली धडकी, काय केलं?

मुंबईच्या रस्त्यांवर इडली आणि वडे मोठ्या संख्येने विकले जातात. मात्र हे पदार्थ मोठ्या प्रमाणात धारावीमध्ये तयार केले जातात. अनेकदा हे अन्न तयार करण्यासाठी नियम पाळणारी आस्थापनं नसतात तर घरातच हे पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आता यांच्यावर देखील FDA ची नजर असणार आहे. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com