रंगावरून हिणवलं, पैशांची मागणी; सततच्या छळाला कंटाळून सहा महिन्यातच नवविवाहितेनं जीवन संपवलं

Kolhapur News : पती चैतन्य बाजीराव पडवळ, सासू नंदा बाजीराव पडवळ, दीर विशाल बाजीराव पडवळ ( तिघेही राहणार पडवळवाडी, ता. गगनबावडा ) या तिघांवर या घटने प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर

कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात एका नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून गौरी गणपती सणानिमित्त माहेरी आलेल्या या महिलेने गळफास घेऊन जीवन संपवल्याची पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. घोटवडे या गावात ही घटना घडली आहे. राधानगरी पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रमिषा पडवळ या महिलेचा पडवळवाडी (ता. गगनबावडा ) गावातील  चैतन्य पडवळ या व्यक्तीशी विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर सहा महिन्यातच या महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. मृत महिलेचा भाऊ राजेंद्र पाटील याने या घटनेची फिर्याद राधानगरी पोलीस ठाण्यात दिली. पती चैतन्य बाजीराव पडवळ, सासू नंदा बाजीराव पडवळ, दीर विशाल बाजीराव पडवळ ( तिघेही राहणार पडवळवाडी, ता. गगनबावडा ) या तिघांवर या घटने प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

(नक्की वाचा -  मोठा आवाज, लाल रंगाचा प्रकाश... आकाशातून पडलेल्या उपकरणाची येवला परिसरात चर्चा)

आत्महत्येचं काय आहे कारण?

13 सप्टेंबर रोजी प्रमिषा पडवळ या महिलेने माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 31 मार्च रोजी या महिलेच पडवळवाडी या गावातील चैतन्य पडवळ या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्याचबरोबर सासू, पती आणि दीर हे तिघे मिळून मानसिक छळ करायचे. तिच्या चेहऱ्याच्या रंगावरून हिनवलं जात असायचं. तसेच माहेरच्या मंडळींनी योग्य तो मनमापान दिला जात नाही म्हणून त्रास दिला जायचा. त्याचबरोबर प्लॅट खरेदीसाठी माहेरच्यांकडून पैसे आणण्याचा तगादा लावला जायचा या सर्व जाचाला कंटाळून प्रमिषाने आत्महत्या केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. 

(नक्की वाचा - 'सिल्लोड आहे की पाकिस्तान , इथं राहायचं की...' दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य, वाद पेटणार?)

भाऊ राजेंद्र पाटील याने फिर्याद दिल्यानंतर संबंधित प्रकरणातील आरोपीची चौकशी करण्यात आली. त्यांनंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
 

Advertisement
Topics mentioned in this article