जाहिरात

CM Fadnavis: 'निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आम्ही निर्णय घेत नाही;' मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भाजप किसान मोर्चाच्या वतीने या भव्य कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

CM Fadnavis: 'निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आम्ही निर्णय घेत नाही;' मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर
CM Devendra Fadnavis : आपल्या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
मुंबई:

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व शेतकऱ्यांसह प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी गावागावातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव नेतृत्व आहे. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकरीवर्ग पूर्ण ताकदीनिशी देवाभाऊ सरकारच्या पाठीशी उभे आहे" असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी केले.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भाजप किसान मोर्चाच्या वतीने या भव्य कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व केवळ घोषणाबाजी करणारे नसून गावागावांतील शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेत त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे आहे. म्हणूनच राज्यातील संपूर्ण शेतकरी वर्ग पूर्ण ताकदीनिशी देवाभाऊ सरकारच्या पाठीशी उभा आहे. या कार्यक्रमात भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार संजय कुटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, ज्याला उपस्थित हजारो शेतकऱ्यांनी हात उंचावून आणि जयघोष करत एकमुखाने पाठिंबा दिला.

Latest and Breaking News on NDTV

शेतकऱ्यांच्या विकासासाठी योजनांचा मागोवा

सरकारने राबवलेल्या विविध शेतकरी हिताच्या योजनांचा मागोवा घेत प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचा गौरव केला. शेतरस्ते आणि पाणंद रस्ते मोकळे करणे, जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा यशस्वीपणे राबवणे, शेती क्षेत्राला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे, यासोबतच कृषी पंपांना दिवसा मोफत वीज देण्याचा निर्णय या सर्व योजनांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

( नक्की वाचा : आता शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी अन् कर्ज चुकवण्याची अटही संपली; वाचा नव्या निर्णयाची A to Z माहिती )

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून निर्णय नाही: मुख्यमंत्री

आपल्या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. समोर कोणतीही राजकीय निवडणूक नसताना आम्ही केवळ शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कर्जमुक्तीचा हा मोठा निर्णय घेतला आहे, कारण आमच्यासाठी शेतकऱ्यांचे हित हा राजकारणाचा किंवा आंदोलनाचा विषय नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले. अनेकांना वाटत होते की सरकार कर्जमाफी करणार नाही आणि आपल्याला आंदोलने करायला मिळतील, पण हे महायुतीचे, म्हणजेच शेतकऱ्यांच्या देवाभाऊचे सरकार असल्याने आम्ही बळीराजाला दिलासा दिला, असेही ते म्हणाले.

Latest and Breaking News on NDTV

48 हजार कोटींचे जुने वीज बिल माफ

शेतकऱ्यांना आणखी एक मोठा दिलासा देताना मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरून महत्त्वाची घोषणा केली. राज्यातील 7.5 अश्वशक्ती क्षमतेच्या कृषी पंपांना आता भरदिवसा आणि पूर्णपणे मोफत वीज दिली जात आहे. या कृषी पंपांचे तब्बल 48 हजार कोटी रुपयांचे जुने वीज बिल पूर्णपणे माफ करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

शेतकऱ्यांची कर्जाची पाटी आता पूर्णपणे कोरी झाली पाहिजे, जेणेकरून त्याला त्या पाटीवर स्वाभिमानाने नव्याने प्रगतीचा इतिहास लिहिता येईल, या उद्देशानेच सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. इस कार्यक्रमाला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण दरेकर, चित्रा वाघ यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि राज्यभरातून आलेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com