Operation Sindoor LIVE Updates: काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या विरोधात भारताने पुकारलेलं ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून दोन्ही देशांकडून हल्ले प्रतिहल्ले सुरु आहेत. पाकिस्तानने गुरुवारी आणि शुक्रवारी भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पाकच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर देत त्यांचा हा डाव भारतीय सैन्याने हाणून पाडला. भारताच्या एस 400 या विमानाने पाकिस्तानची ड्रोन, मिसाईल आणि लढाऊ विमाने पाडलीत. शुक्रवारीही पाकिस्ताननं 36 ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतानं हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले.
पाकिस्ताननं हल्ले थांबवावेत, भारतीय सैन्य चोख उत्तर देण्यास समर्थ!
भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामंजस्याचं पाकिस्तानकडून उल्लंघन होत आहे. पाकिस्ताननं परिस्थिती समजून घ्यावी. यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामंजस्यबाबत नीट माहिती घ्यावी. भारतानं या उल्लंघनाची गांभीर्यानं दखल घेतली आहे. या प्रकारच्या कोणत्याही कृतीला सशस्त्र दल चोख उत्तर देईल, असा इशारा परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिला आहे.
गोळीबार आणि स्फोटाच्या आवाजानं श्रीनगर हादरलं, ओमर अब्दुल्ला यांची माहिती
जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा गोळीबार आणि स्फोटाचा आवाज ऐकू आला आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
Live Update : वैनगंगा नदीच्या पात्रात MBBS चे 3 विद्यार्थी बुडाले !
चंद्रपूर गडचिरोली सीमेवरील वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेले गडचिरोली येथील तीन MBBS चे विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे तिन्ही युवक बाहेर जिल्ह्यातील रहिवासी आहे, गडचिरोली येथे MBBS च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. आज सुटी असल्याने आठ मित्र वैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेले. मात्र यातील तीन जण बुडाले, तर पाच जण बाहेर निघण्यात यशस्वी झाले. बुडालेल्या युवकांत गोपाळ गणेश साखरे, पार्थ बाळासाहेब जाधव, स्वप्नील उद्धवसिंग शिरे यांचा समावेश आहे. रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली आहे
Live Update : चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू
तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या वनविभागाच्या परिक्षेत्रात घडली. या घटनेत एकाच कुटुंबातील सासू व सूनेचा मृत्यू झाला. मृतक महिलेचं नाव कांता बुधाजी चौधरी वय (65), शुभांगी मनोज चौधरी (28), रेखा शालिक शेंडे (50) आहे. या तिघीही मेंढा माल गावातील रहिवाशी आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी वनविभाग अधिकारी आणि पोलिस कर्मचारी दाखल झाले आहेत.
Operation Sindoor Live Updates: भारत- पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. त्याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. भारत आणि पाकिस्तान हे पूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधी करण्यास तयार आहेत, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर हा दावा केलाय.
Operation Sindoor Live Updates: मुंबईत फटाके उडवण्यास बंदी, पोलिसांचा मोठा आदेश
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. या काळात मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना पोलिसांनी दिली आहे. 11 मे ते 9 जून दरम्यान कोणत्याही प्रकारचे फटाके किंवा रॉकेट उडवू नका, अशी सूचना मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी याबाबत पत्रक काढले आहे.
Operation Sindoor Live Updates: कोणतीही दहशतवादी कारवाई आता युद्ध समजली जाणार
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' सुरु केलं आहे. या' ऑपरेशन सिंदूर' च्या दरम्यान भारतानं मोठा निर्णय घेतला आहे. आता कोणतीही दहशतवादी कारवाई ही युद्ध समजली जाणार आहे.
Operation Sindoor Live Updates: रेल्वेचा मोठा निर्णय, 'या' भागातील रात्रीची वाहतूक रद्द
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीर आणि पंजाबमधील पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात रात्रीची रेल्वे वाहतूक होणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतसर, भटिंडा, फिरोजपूर, जम्मू या भागातून रात्री जाणाऱ्या रेल्वेचं वेळापत्रक बदलण्यात येणार आहे.
या सर्व रेल्वे आता सकाळी धावतील. काही जवळच्या रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे जवळपास 15 पेक्षा जास्त रेल्वेची वाहतूक प्रभावित होणार आहे. रात्री होणाऱ्या ब्लॅक आऊटमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
Operation Sindoor Live Updates: मोठी अपडेट! भारत- पाक संघर्षात अमेरिकेकडून मध्यस्थीचा प्रस्ताव
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरु असतानाच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावादरम्यान अमेरिकेने मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे. अमेरिकेने भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा करत मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे.
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर: संरक्षण विभाग
पाकिस्तानकडून हालचाली सुरु झाल्या आहेत गेल्या दोन दिवसांपासून हल्ले सुरु आहेत. पाकिस्तानकडून पसरवण्यात आलेल्या अफवांबाबत आम्ही निराश आहोत.
पाकिस्तान सेनाने पश्मिम विभागात हल्ले सुरु केले आहेत. त्यांनी भारतीय सैन्याला टार्गेट केले आहे. गोळीबार सुरु आहे. आंतराराष्ट्रीय सेना, एलओसीवर सतत गोळीबार सुरु आहे ज्याचा भारतीय सैन्याने प्रतिकार केला.
पाकिस्तानने हायस्पीड मिसाईलही पंजाबच्या हवाई अड्ड्यावर सुरु केले. निंदनीय म्हणजे नागरिकांवरही हल्ले करण्याचा प्रयत्न आहे. पाकिस्तानकडून मुद्दाम निशाणे केल्यानंतरही भारतीय सैन्याने मात्र त्यांच्या उपकरणांना टार्गेट केले जात आहे. या कारवाईत भारताने कमीत कमी नुकसान होईल याकडे लक्ष दिले.
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणांचाही गैरवापर केला आहे. पाकिस्तानने चुकीची माहितीचा आधार घेत काही हवाई अड्डे तसेच शस्त्रसाठा नष्ट केल्याचाही खोटा दावा केला आहे. भारतीय सैन्याने प्रभावीपणे उत्तर देत पाकिस्तानी सेनेला नामोहरण केले. आत्तापर्यंतभारताकडून पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला चोख आणि योग्यपणे उत्तर देण्यात आले आहे.
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद
ऑपरेशन सिंदूरबाबत थोड्याच वेळात भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद सुरु होईल. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावाबाबत यावेळी माहिती देण्यात येणार आहे.
Maharashtra Live Updates: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावरुन मुंबईत दाखल
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काल दुपारी 12 वाजता मुंबईत दाखल...
मोठ्या सुट्टीनंतर ठाकरे कुटुंब मुंबईत दाखल...
22 एप्रिलपासून उद्धव ठाकरे आणि कुटुंब परदेशात होते
मुंबईत आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी विक्रोळीतील एका कार्यक्रमाला लावली उपस्थिती
शिवसेना आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिंद्धेश शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांची मुलगी धनश्री विचारे यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली...
Operation Sindoor Live Updates: अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी गेले आहेत. ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तानमध्ये सुरु असलेला तणाव याबाबत या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Ind vs Pak Live Updates: पाकिस्तानचा ड्रोन हल्ला भारतीय लष्कराने उधळला
भारतीय लष्कराने पश्चिम सीमेवर पाकिस्तानी ड्रोन हल्ला उधळून लावला
Operation Sindoor Live Updates: बीएसएफचा पाकला दणका! दहशतवादी लाँच पॅड उध्वस्त
अखनूर क्षेत्रासमोरील पाकिस्तानातील सियालकोट जिल्ह्यातील लूनी येथील दहशतवादी लाँच पॅड बीएसएफने पूर्णपणे उद्ध्वस्त केले.
Live Updates: सुप्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे निधन
पानिपत, बेल बॉटम ,उरी, डर्टी ब्लॅकमेल , दंगल , पीके, झांशी, सुपर 30 केदारनाथ अशा अनेक सिनेमात त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून त्यांनी उत्तम जबाबदारी निभावली.छत्रपती शिवाजी महाराज या ऐतिहासिक मालिकेत त्यांनी प्रसिद्ध रंगभूषाकार म्हणून जबाबदारी पार पडली होती
पावनखिंड , फत्ते शिकस्त, शेर शिवराज अशा ऐतिहासिक मालिकांमध्ये देखील त्यांनी रंगभूषाकार म्हणून उत्तम जबाबदारी निभावली होती. सात वेळा राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. संध्याकाळी चार वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील
Vikram Gaikwad passed Away: सुप्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे निधन
सुप्रसिद्, राष्ट्रीय पुरस्कार विजेते रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे मुंबईत निधन.
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये मोठी कारवाई! भारतीय लष्कराकडून पाकचे ड्रोन नष्ट केले
पाकिस्तानकडून भारताच्या पश्चिम सीमेवर ड्रोन हल्ले आणि इतर हालचाली सुरूच आहेत. आज सकाळी 5 वाजता, अमृतसरमधील खासा कॅन्टवर अनेक शत्रू सशस्त्र ड्रोन उडताना दिसले. आमच्या हवाई संरक्षण युनिट्सनी शत्रू ड्रोनवर तात्काळ हल्ला केला आणि ते नष्ट केले: संरक्षण अधिकारी
Operation Sindoor Live Updates: जम्मू काश्मीरमधील सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडले
भारत पाकिस्तानमधील तणावादरम्यान एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवरील सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Operation Sindoor Live: भारत- पाकिस्तानमध्ये वाढता तणाव: सकाळी 10 वाजता लष्कराची पत्रकार परीषद
पाकिस्तानसोबत वाढत्या तणावादरम्यान, भारतीय लष्कर पाकिस्तानला योग्य उत्तर देत आहे. लष्कराच्या या कारवाईबाबत सकाळी १० वाजता पत्रकार परिषद आयोजित केली जाईल.
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांवर हल्ले, घरांचे मोठे नुकसान
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांवर हल्ला, घरांचे मोठे नुकसान
Operation Sindoor Live: भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या चौक्या आणि लाँच पॅड उध्वस्तः सूत्रांची माहिती
जम्मूजवळ तैनात असलेल्या भारतीय सैन्याने पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड नष्ट केल्याचा दावा केला जात आहे.
Live Updates: जायकवाडी धरणावर पुढील चार दिवस पर्यटकांना प्रवेश बंद
जायकवाडी धरणावर पुढील चार दिवस पर्यटकांना प्रवेश बंद
सुरक्षा कारणास्तव घेण्यात आला निर्णय
धरण परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार
भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धरणाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला
धरणावर यंत्रसामग्री व सायरन बसवण्याचे आदेश देण्यात आले आहे
अनोळखी व्यक्ती व वाहनांना धरणावर प्रवेश दिला जाणार नाही
Operation Sindoor LIVE Updates: पाकिस्तानला मिळाले आयएमएफकडून कर्ज
पाकिस्तानला मिळाले आयएमएफकडून कर्ज:
Operation Sindoor LIVE Updates: पाकिस्तानला मिळाले आयएमएफकडून कर्ज
पाकिस्तानला मिळाले आयएमएफकडून कर्ज:
Pune News: पुण्यातील सिंहगड महाविद्यालयातील त्या तरुणीवर कारवाई
पुण्यातील सिंहगड महाविद्यालयातील त्या तरुणीवर कारवाई
गुन्हा दाखल झाल्यानंतर महाविद्यालयाने तरुणीला केलं रस्टिकेट
पुण्यातील सिंहगड महाविद्यालयातिल विद्यार्थिनीला पाकिस्तानच्या समर्थनात सोशल मीडिया वर पोस्ट केल्यामुळे करण्यात आल रस्टिकेट
सिंहगड महाविद्यालयाने खदिजा शेख हिला कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिच्यावर केली कारवाई
खदिजा शेख नावाच्या विद्यार्थिनीने आपल्या सोशल मीडिया हैंडल वर पाकिस्तानच्या समर्थनात केले होते पोस्ट
कोंढवा पोलिसांनी करवाई करत खदिजा शेख हिला अटक केली असून आता महाविद्यालयाने देखील तिला रस्टिकेट केल