जाहिरात
4 minutes ago

Operation Sindoor LIVE Updates: काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या विरोधात भारताने पुकारलेलं ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून दोन्ही देशांकडून हल्ले प्रतिहल्ले सुरु आहेत. पाकिस्तानने गुरुवारी आणि शुक्रवारी भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पाकच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर देत त्यांचा हा डाव भारतीय सैन्याने हाणून पाडला. भारताच्या एस 400 या विमानाने पाकिस्तानची ड्रोन, मिसाईल आणि लढाऊ विमाने पाडलीत. शुक्रवारीही पाकिस्ताननं 36 ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतानं हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले. 

Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद

ऑपरेशन सिंदूरबाबत थोड्याच वेळात भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद सुरु होईल. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावाबाबत यावेळी माहिती देण्यात येणार आहे. 

Maharashtra Live Updates: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावरुन मुंबईत दाखल

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काल दुपारी 12 वाजता मुंबईत दाखल... 

मोठ्या सुट्टीनंतर ठाकरे कुटुंब मुंबईत दाखल...

22 एप्रिलपासून उद्धव ठाकरे आणि कुटुंब परदेशात होते 

मुंबईत आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी विक्रोळीतील एका कार्यक्रमाला लावली उपस्थिती 

शिवसेना आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिंद्धेश शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांची मुलगी धनश्री विचारे यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली...

Operation Sindoor Live Updates: अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी गेले आहेत. ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तानमध्ये सुरु असलेला तणाव याबाबत या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

Ind vs Pak Live Updates: पाकिस्तानचा ड्रोन हल्ला भारतीय लष्कराने उधळला

भारतीय लष्कराने पश्चिम सीमेवर पाकिस्तानी ड्रोन हल्ला उधळून लावला

Operation Sindoor Live Updates: बीएसएफचा पाकला दणका! दहशतवादी लाँच पॅड उध्वस्त

अखनूर क्षेत्रासमोरील पाकिस्तानातील सियालकोट जिल्ह्यातील लूनी येथील दहशतवादी लाँच पॅड बीएसएफने पूर्णपणे उद्ध्वस्त केले.

Live Updates: सुप्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे निधन

पानिपत, बेल बॉटम ,उरी, डर्टी ब्लॅकमेल , दंगल , पीके, झांशी, सुपर 30 केदारनाथ अशा अनेक सिनेमात त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून त्यांनी उत्तम जबाबदारी निभावली.छत्रपती शिवाजी महाराज या ऐतिहासिक मालिकेत त्यांनी प्रसिद्ध रंगभूषाकार म्हणून जबाबदारी पार पडली होती

पावनखिंड , फत्ते शिकस्त, शेर शिवराज  अशा ऐतिहासिक मालिकांमध्ये देखील त्यांनी रंगभूषाकार म्हणून उत्तम जबाबदारी निभावली होती. सात वेळा राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. संध्याकाळी चार वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील

Vikram Gaikwad passed Away: सुप्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे निधन

सुप्रसिद्, राष्ट्रीय पुरस्कार विजेते रंगभूषाकार  विक्रम गायकवाड यांचे मुंबईत निधन.

Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये मोठी कारवाई! भारतीय लष्कराकडून पाकचे ड्रोन नष्ट केले

 पाकिस्तानकडून भारताच्या  पश्चिम सीमेवर ड्रोन हल्ले आणि इतर हालचाली सुरूच आहेत.  आज सकाळी 5 वाजता, अमृतसरमधील खासा कॅन्टवर अनेक शत्रू सशस्त्र ड्रोन उडताना दिसले. आमच्या हवाई संरक्षण युनिट्सनी शत्रू ड्रोनवर तात्काळ हल्ला केला आणि ते नष्ट केले: संरक्षण अधिकारी

Operation Sindoor Live Updates: जम्मू काश्मीरमधील सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडले

भारत पाकिस्तानमधील तणावादरम्यान एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवरील सलाल धरणाचे  दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

Operation Sindoor Live: भारत- पाकिस्तानमध्ये वाढता तणाव: सकाळी 10 वाजता लष्कराची पत्रकार परीषद

पाकिस्तानसोबत वाढत्या तणावादरम्यान, भारतीय लष्कर पाकिस्तानला योग्य उत्तर देत आहे. लष्कराच्या या कारवाईबाबत सकाळी १० वाजता पत्रकार परिषद आयोजित केली जाईल.

Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांवर हल्ले, घरांचे मोठे नुकसान

Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांवर हल्ला, घरांचे मोठे नुकसान

Operation Sindoor Live: भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या चौक्या आणि लाँच पॅड उध्वस्तः सूत्रांची माहिती

जम्मूजवळ तैनात असलेल्या भारतीय सैन्याने पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड नष्ट केल्याचा दावा केला जात आहे. 

Live Updates: जायकवाडी धरणावर पुढील चार दिवस पर्यटकांना प्रवेश बंद

जायकवाडी धरणावर पुढील चार दिवस पर्यटकांना प्रवेश बंद 

सुरक्षा कारणास्तव घेण्यात आला निर्णय 

धरण परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार 

भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धरणाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला

धरणावर यंत्रसामग्री व सायरन बसवण्याचे आदेश देण्यात आले आहे

अनोळखी व्यक्ती व वाहनांना धरणावर प्रवेश दिला जाणार नाही

Operation Sindoor LIVE Updates: पाकिस्तानला मिळाले आयएमएफकडून कर्ज

पाकिस्तानला मिळाले आयएमएफकडून कर्ज: 

Operation Sindoor LIVE Updates: पाकिस्तानला मिळाले आयएमएफकडून कर्ज

पाकिस्तानला मिळाले आयएमएफकडून कर्ज: 

Pune News: पुण्यातील सिंहगड महाविद्यालयातील त्या तरुणीवर कारवाई

पुण्यातील सिंहगड महाविद्यालयातील त्या तरुणीवर कारवाई 

गुन्हा दाखल झाल्यानंतर महाविद्यालयाने तरुणीला केलं रस्टिकेट

पुण्यातील सिंहगड महाविद्यालयातिल विद्यार्थिनीला पाकिस्तानच्या समर्थनात सोशल मीडिया वर पोस्ट केल्यामुळे करण्यात आल रस्टिकेट 

सिंहगड महाविद्यालयाने खदिजा शेख हिला कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिच्यावर केली कारवाई

खदिजा शेख नावाच्या विद्यार्थिनीने आपल्या सोशल मीडिया हैंडल वर पाकिस्तानच्या समर्थनात केले होते पोस्ट 

कोंढवा पोलिसांनी करवाई करत खदिजा शेख हिला अटक केली असून आता महाविद्यालयाने देखील तिला रस्टिकेट केल

Listen to the latest songs, only on JioSaavn.com