Operation Sindoor : इन्स्टाग्रामवर ऑपरेशन सिंदूरविरोधात पोस्ट, माओवादी समर्थक विद्यार्थ्याला नागपुरातून अटक

ऑपरेशन सिंदूरवर टीका करणारी पोस्ट शेअर केल्या प्रकरणी रेजाझ याला अट करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

संजय तिवारी, प्रतिनिधी

ऑपरेशन सिंदूरवर टीका करणारी पोस्ट शेअर केल्या प्रकरणी केरळ येथील माओवादी समर्थक आणि कथित विद्यार्थी नेता रेजाझ एम शिबा सैदिक याला त्याच्या गर्लफ्रेंडसह नागपुरातून अटक करण्यात आली आहे. इंस्टाग्रामवर ऑपरेशन सिंदूरवर टीका करणारी पोस्ट शेअर केली होती. मध्य नागपूरच्या एका हॉटेलमध्ये सैदिक याच्याकडून माओवादी साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. सैदिक हा केरळ येथील वामपंथी संघटना डेमोक्रॅटिक स्टुडेंट्स युनियनचा अध्यक्ष आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सरकारने माओवाद्यांशी करार करावा या मागणीचं पुस्तक प्रकाशित करण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याकरिता तो निधी संकलन करण्यासाठी नागपुरात आला होता. सध्या छत्तीसगढ येथील कर्रेगुट्टा पर्वत भागात सुरू असलेल्या माओवादी अभियानासंबंधातील साहित्य त्याच्याजवळ सापडल्याची माहिती आहे. यात कर्रेगुट्टा पर्वतावरील भारतीय दलाकडून करण्यात आलेली घेराबंदी काढून टाकण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शिवाय माओवादी विचारक प्रोफेसर जी एन साईबाबा यावरील पुस्तक देखील त्याच्या जवळ सापडलं आहे.

नक्की वाचा - India Pakistan News : भारताच्या सीमा भागात रात्रीच्या अंधारात काय घडलं? भारतीय सैन्याने शेअर केला Video

केंद्रीय एजन्सीच्या सहकार्याने रेजाझची झालेली अटक शहरी माओवाद्यांच्या विरोधातील महत्वाचे पाऊल मानले जात आहे. रेजाझची मैत्रीण नागपूरच्या एका प्रथितयश कॉलेजची विद्यार्थिनी आहे. सुरक्षा एजन्सीच्या विनंतीवरून रेजाझ याचे इंस्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आले आहे.

Advertisement
Topics mentioned in this article