Nagpur News : 'मी थेट बावनकुळेंशी बोलेन; वाद मिटवायला गेलेल्या पोलिसांना आयोजकांची धमकी

नागपुरात फ्रेंडशिपडेच्या (3 ऑगस्ट 2025) रात्री कामठी रोडवर एडन ग्रीन्स रिसार्ट येथे ‘फ्रेंड्स अँड बियॉंड’ इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur News : नागपुरात फ्रेंडशिपडेच्या (3 ऑगस्ट 2025) रात्री कामठी रोडवर एडन ग्रीन्स रिसार्ट येथे ‘फ्रेंड्स अँड बियॉंड' इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी या कार्यक्रमादरम्यान गोंधळ झाल्याचं समोर आलं होतं. हा गोंधळ सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांकडे आयोजकांनी अरेरावी केल्याचं समोर आलं आहे. आयोजकांनी पोलिसांना धमकी दिली, मी बावनकुळेंशी बोलेन अशी थेट धमकी दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मैत्रीदिनानिमित्ताने आयोजित फ्रेंड्स अँड बियॉंड या कार्यक्रमादरम्यान गोंधळ झाला होता. दोन गटांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळताच जुनी कामठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, परिस्थिती शांत करण्याऐवजी आयोजकाचा उर्मटपणा समोर आला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडिओ समोर आला आहे. 

नक्की वाचा - 2 वाघ करत होते आराम अन् तरुणाने थेट पिंजऱ्यात घेतली उडी; पुढे काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आयोजक एका पोलीस अधिकाऱ्याला उघडपणे धमकावताना दिसतोय. मी थेट बावनकुळेंशी बोलेन असं आयोजन पोलिसांना सांगताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा वाद सुरु होता. संगीत बंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही बाजूंनी तडजोड झाल्याने एफआयआर नोंदवला नाही, असे जुनी कामठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी सांगितले. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार आयोजकाने सरळ पालकमंत्र्यांचे नाव घेऊन राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला अशी माहिती आहे. डीसीपी निकेतन कदम यांनी व्हायरल व्हिडिओचा तपास सुरु असल्याचे सांगितले. आयोजकाला लवकरच चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article