Crime News: नाशिकनंतर वसईमधील बाबाची विकृती! 'मी महादेव, तू पार्वती', महिलेसोबत भयंकर घडलं

वसईमध्येही एका स्वयंघोषित धर्मगुरूने स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे भासवून महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर:

Vasai Crime:  राज्यभरात नाशिकचा अत्याचारी बाबा कॅप्टन खरातच्या क्रुर कृत्यांच्या मालिकांनी खळबळ उडाली आहे. भविष्य सांगण्याच्या नावाखाली या भोंदुबाबाने शेकडो महिलांवर अत्याचार केल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. खरात प्रकरणाने संतापाची लाट उसळली असतानाच आता वसईमध्येही एका स्वयंघोषित धर्मगुरूने स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे भासवून महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. 

"मी महादेव, तू पार्वती".. वसईमध्येही धक्कादायक प्रकार

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वसईत स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे भासवून एका ३५ वर्षीय महिलेची फसवणूक करत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्याविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे मूळ पुण्यात असल्याने पुढील तपास हडपसर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.

Advertisement

Ram Navami Rally: खळबळजनक! श्रीरामपूरमध्ये राम नवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक, मौलानांसह 12 जणांवर गुन्हा

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, २०२३ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून पीडित महिलेची ऋषिकेश वैद्य याच्यासोबत ओळख झाली. तिच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत त्याने अध्यात्माच्या नावाखाली जवळीक निर्माण केली. डिसेंबर २०२३ मध्ये पुण्यात भेटीदरम्यान “मी शंकर असून तू पार्वती आहेस” असे सांगत तिला भुलवण्यात आले.

महिलेवर अत्याचार 

त्यानंतर मांजरी परिसरातील लॉजमध्ये नेऊन गुंगीकारक पदार्थ देत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. इतक्यावर न थांबता, तिच्या नकळत काढलेल्या अश्लील छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करण्यात आले. मे २०२५ मध्ये वसईतील एका हॉटेलमध्ये पुन्हा बोलावून अत्याचाराचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, इतर एका प्रकरणानंतर धाडस एकवटून पीडितेने ही बाब पतीला सांगितली आणि अखेर पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणात आणखी महिलांची फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त होत असून पोलिस तपास सुरू आहे.

( नक्की वाचा : Ram Navami Rally: नालासोपाऱ्यात ठिणगी! रामनवमी रॅलीत पोलीस-भाविकांमध्ये झटापट, नेमकं काय घडलं? )

Topics mentioned in this article