मनोज सातवी, पालघर:
Palghar Crime: औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी तलासरी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमध्ये २६.२८ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. नेमकी कशी केली ही कारवाई? जाणून घ्या सविस्तर...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत तलासरी पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल २६ लाख २८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई–अहमदाबाद महामार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे.
Shocking! खोटं रील, खरोखर जीव गेला.. महिलेचा तडफडून मृत्यू; एका चुकीने भयंकर घडलं
महामार्गावरुन मुंबईकडे जाणाऱ्या टाटा टेम्पो मधून औषधांच्या नावाखाली औषधांच्या नावाखाली महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. हिमाचल-पंजाब ढाबा परिसरात टेम्पोची तपासणी केली असता, ९ लाख २८ हजार ३२० रुपयांची दारू आढळून आली. वाहनासह एकूण २६.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणी चालक शिवेंद्रकुमार लालबाबु ठाकुर (वय ४१, रा. मुंबई) याला अटक करण्यात आली असून तलासरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death :बॉम्ब,कट, अपघात की घातपात? अजित पवारांच्या मृत्यूभोवतीच्या 7 मोठ्या शंका; उत्तरं कधी मिळणार? )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world