Palghar News: पोलीस भरती झाला, पण वर्दी चढवण्याआधीच मृत्यूने गाठलं, पालघरमधील घटनेने हळहळ

आदित्य हा मित्रांसोबत वांद्री धरण परिसरात पर्यटनासाठी असता धरणाच्या पाण्यात पोहत असताना त्याचा बुडून मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

 मनोज सातवी, पालघर: पालघर तालुक्यातील वांद्री धरणात पोहायला उतरलेल्या युवकाचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. आदित्य खैरे (वय.20)असे मयत युवकाचे  नाव आहे. तो नालासोपारा शहराच्या पश्चिमे कडील निळेमोरे भागाचा रहिवाशी होता. आदित्य हा मित्रांसोबत वांद्री धरण परिसरात पर्यटनासाठी असता धरणाच्या पाण्यात पोहत असताना त्याचा बुडून मृत्यू झाला.

विशेष म्हणजे आदित्य खैरे याची पोलिस दलात नियुक्ती झाली होती आणि लवकर असतो पोलीस खात्यात सेवेसाठी रुजू होणार होता. वांद्री धरण परिसरात पर्यटकांच्या संखेत वाढ  होत असून, वसई विरार महापालिका भागातील पर्यटक मोठ्या संख्येने वांद्री धरणावर येत असतात. परंतु धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या अगोदर वांद्री धरणात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे

1) दिनांक 01 ऑक्टोबर 2019 
जॉन्सन फर्नांडो (वय.24) वसईतील एव्हरशाईन सिटी

2) दिनांक 16 जुलै 2023
राहुल सुरेश खरात (वय.30) मुंबई माझगाव कॉटन ग्रीन काळाचौकी 

3) दिनांक 08 मार्च 2023
स्वप्निल विजय मस्के (वय. 27)
अजय पांडुरंग साळवे (वय.26) दोघेही रा.मुंबई

नक्की वाचा - Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पालघर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीसोबत शेतीला पूरक व्यवसाय असलेल्या वीट उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठ्या नुकसान झाले आहे. पालघर तालुक्यात 270 वीट उत्पादक असून जिल्ह्यात जवळपास दोन हजार पेक्षा जास्त वीट उत्पादक आहेत.

Sanjay Raut News: 'शरद पवारांचे राजकारण वेगळं, त्यांच्याशिवाय आमचा संघर्ष ...' संजय राऊतांचे मोठे विधान

Topics mentioned in this article