Palghar News: पालघरमधील 'हा' उड्डाणपूल ठरतोय अपघाताचा हॉटस्पॉट! 24 तासांत 5 दुर्घटना

गेल्या 24 तासात या ठिकाणी पाच वाहन अपघातग्रस्त झाली असून यामध्ये पाच ते सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर:

Palghar Accident News:  पालघरच्या  डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी उड्डाण पुलावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसत आहे. या मार्गावर 24 तासांत 5 वाहनांना अपघात झाला असून यामध्ये 5 जण जखमी झाले आहेत. उड्डाणपुलावरील खड्डे या अपघातांचे कारण ठरत आहे, मात्र NHAI कडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

अपघातांची मालिका सुरुच..

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विवळवेढे महालक्ष्मी उड्डाणपुलावर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सातत्याने अपघातांची मालिका सुरूच आहे, गेल्या 24 तासात या ठिकाणी पाच वाहन अपघातग्रस्त झाली असून यामध्ये पाच ते सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Pune News: पुण्यात भाजपाचा 'मास्टर प्लॅन'! 'या' कारणाने इच्छुकांची धाकधूक वाढली

काल शुक्रवारी मुंबई वाहिनीवर खड्ड्यांमुळे एका ट्रक चालकाने ब्रेक घेतला असता मागून येणाऱ्या वाहनांनी ट्रकला जोरदार धडक दिली असून यामध्ये दोन ट्रक दरम्यान एक कार चिरडली गेली. सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी चालक आणि एक महिला प्रवाशाला गंभीर जखमी झाले आहेत. तर अपघात ग्रस्त कारचा चंदामेंदाच झाला आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष!

याच ठिकाणी आज पुन्हा अपघात झाला आहे. सुदैवाने गंभीर जखमी झालेलं नसले तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  महामार्गावर विवळवेढे उड्डाण पुला प्रमाणेच घोळ, आंबोली, दुर्वेस, वरई, खानिवडे येथील नदीवरील पुलांची दुर्दशा झाली आहे. यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) वेळीवेळी तकलादू उपाययोजना करण्यात येत असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. आणि सामान्य नागरिकांचा याच बळी जात आहे. 

Advertisement

Pune Traffic: भीमा-कोरेगाव शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज, बुधवारपासून वाहतुकीत मोठे बदल, चेक करा पर्यायी मार्ग