Palghar News: एसटी बसचं चाक निखळलं, तरी ही अर्धा किलो मिटर धावली लालपरी, पुढे जे घडलं ते जाणून...

या गंभीर प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या निष्काळजी कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पालघर जिल्ह्यातील जव्हार आगारातून निघालेली एसटी बस धावत असताना मागील चाक निखळले पण चालकाला ते लक्षात आले नाही
  • बसमध्ये जवळपास पन्नास प्रवासी होते आणि चाक निखळल्यानंतर अर्धा किलोमीटर बस धावली
  • दुसऱ्या टायर फुटल्यानंतर ही बाब चालकाच्या लक्षात आली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पालघर:

मनोज सातवी

एसटी बस म्हणजेच लालपरी प्रवाशांची पहिली पसंती असते. गाव तिथे एसटी हे जणू समिकरण आहे. त्यामुळे आपलं गाव गाठण्यासाठी अनेक जण एसटीतून प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात. शिवाय एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास असा विश्वास अनेकांच्या मनात आहे. अशा वेळी उशिर झाला तरी चालेल पण एसटीनेच जाईन अशीच भूमीका अनेकांची असते. येवढा विश्वास सर्व सामान्यांच्या मनात असतानाही या विश्वासाला तडा जाणारी धक्कादायक घटना पुन्हा एकदा पालघरमध्ये घडली आहे.  

जव्हार आगाराची एसटी बस होती. ही बस ठाण्याहून जव्हारकडे निघाली होती. ही बस वाडा भिवंडी मार्गावर धावत होती. बसमध्ये त्यावेळी जवळपास 50 प्रवासी होते. गाडी धावत असताना ही बस नेहरोली या गावाजवळ पोहोचली. त्याच वेळी बसचे मागील एक चाक निखळून पडले. पण चाक निखळले आहे हे ना चालकाच्या लक्षात आले ना वाहकाच्या लक्षात आले. प्रवाशी ही बस सुरू आहे म्हणून निवांत बसून होते. कोणालाच चाक निखळले आहे याची साधी कल्पनाही आली नाही. 

Advertisement

नक्की वाचा - Siya Goyal: सोनम सुटली! सिया गोयल ही जामीनावर सुटणार? कोर्टाच्या 'त्या' निकालाने खळबळ

अशाच स्थितीत ही एसटी बस जवळपास अर्धा किलोमीटर धावत राहिली. मात्र त्याच वेळी बसचा दुसरा टायर फुटला. बस थांबवली गेली. ज्यावेळी सर्व जण खाली उतरले त्यावेळी एक चाक निखळले होते. तर दुसऱ्या चाकाचा टायप पंक्चर झाला होता. नशिब बलबत्तर म्हणून बसचा मोठा अपघात होता होता टळला.  बसमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह 50 प्रवासी प्रवास करत होते. खाली उतरल्यानंतर त्यांना या अपघाताची कल्पना आली. त्यांनी आपण वाचलो यामुळे सुटकेचा निश्वास सोडला. 

नक्की वाचा - Lohagad Case: सिया-चेतनला कोर्टात हजर केल्यानंतर काय घडलं? कुणाच्या वकिलांनी काय केला युक्तीवाद? वाचा सविस्तर

या गंभीर प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या निष्काळजी कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी प्रवाशांनी आता केली आहे. एसटी महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे 50 प्रवाशांचा जीव धोक्यात गेला होता. केवळ नशिब म्हणून मोठा अपघात होता होता टळला आहे. पालघर जिल्ह्यात या आधी ही अशाच घटना घडल्या आहेत. कधी बसचे छप्पर उडाले होते. तर कधी बसमध्येच बंद पडत होती. पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. इथं असलेल्या एसटी बस या निकृष्ट दर्जाच्या आहेत का? त्यांना मेंटेन ठेवले जात नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे.