Palghar News: विरार ते वलसाड मार्गावरील प्रवाशांना दिलासा! 'ही' विशेष रेल्वे आता दररोज धावणार

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कर्मचारी, व्यापारी, तसेच विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

मनोज सातवी, पालघर:

 Bandra-Udhna special train News: विरार ते वलसाडदरम्यान प्रवास करणाऱ्या कर्मचारी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. वांद्रे–उधना ही विशेष रेल्वे आता दररोज धावणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कर्मचारी, व्यापारी, तसेच विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

विरार ते वलसाड मार्गावरील प्रवाशांना दिलासा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून वांद्रे–उधना विशेष रेल्वे सेवा आता दररोज धावणार आहे. यापूर्वी आठवड्यातून पाच दिवसच ही सेवा असल्याने गुरुवार आणि शुक्रवारी प्रवाशांची गैरसोय होत होती. डॉ. सवरा यांनी हा प्रश्न रेल्वे प्रशासन, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच संसदेत सातत्याने मांडला.

Pune News: चुकलं की हुकलं! सोडतीमुळे पिंपरी चिंचवडमध्ये महापौरपदासाठी ट्वीस्ट, मोठी रस्सीखेच

 त्यानंतर गुरुवार आणि शुक्रवारसाठी नवीन विशेष गाड्या घोषित करण्यात आल्या असून सेवा प्रत्यक्षात दैनिक झाली आहे. या निर्णयामुळे विरार ते वलसाडदरम्यान प्रवास करणाऱ्या कर्मचारी, कामगार, व्यापारी व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वांद्रे–भिवाणी सुट्टी विशेष रेल्वेला पालघर स्थानकात थांबा मंजूर करण्यात आला आहे.

Topics mentioned in this article