Palghar News: धावत्या ST बसचं चाक निखळलं, त्याच स्थितीत बस धावली, अन् पुढे जावून जे झालं ते...

एसटी बसचं चाक निखळलं. ते कदाचीत चालकाच्याही लक्षात आलं नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
पालघर:

मनोज सातवी

राज्य परिवहन महामंडळाच्या बस म्हणजेच एसटी याबाबत अनेक तक्रारी आपण ऐकत असतो. गाव तिथे एसटी हे आपल्याला माहित आहे. पण प्रत्येक एसटी तिथे तक्रार हे ही काही चुकलेलं नाही. त्याचा प्रत्यय तर वेळोवेळी आला आहे. एसटी महामंडळाने किती ही चांगल्या सेवेचा दावा केला तरी कुठे ना कुठे काही तरी अघटीत घटत असतं त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. ही घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. इथं एका धावत्या एसटी बसचं चाकचं निखळलं. ऐवढचं नाही तर त्याच अवस्थेत ही बस पुढे धावली. त्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 

पालघर जिल्ह्यातील राज्य परिवहन मंडळाच्या वाडा आगारा मधील भंगार बसमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे. एका धावत्या बसचं पुढचं चाक निखळलं. मग चाक निखळलेल्या अवस्थेतच ही ST बस 80 ते 90 मीटर पर्यंत पुढे गेली. हा  धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. वाडा ते तिळसे या मार्गावर गवते पाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. अत्यंत गंभीर अशा प्रकारची ही घटना आहे. या बसमध्ये प्रवाशी ही होती. त्याचा जीव त्यामुळे धोक्यात होता. 

नक्की वाचा - 1,2,3... बाप रे बाप! एका ऑटो रिक्षातून निघाले 22 शाळकरी विद्यार्थी, Video पाहून सगळेच हादरले!

जी माहिती पुढे येत आहे त्यानुसार या बसमध्ये सहा प्रवासी होती. एसटी प्रशासनाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. बसचं चाक निखळलं. ते कदाचीत चालकाच्याही लक्षात आलं नाही. त्याने त्याच स्थिती ही बस पुढे नेली. यात बसमधले प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र यावेळी मोठा अनर्थ टळला हे त्याचं नशिब समजावे. त्यामुळे वाड्यासह संपूर्ण पालघर जिल्ह्यात राज्य परिवहन मंडळाच्या भंगार बसेसचे ऑडिट करून नवीन आणि सुसज्ज आरामदायी अशा बसची व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. प्रवाशांच्या जीवावर बेतणाऱ्या भंगार बस बदलाव्यात अशी मागणी ही आता जोर धरू लागली आहे.  

नक्की वाचा - CIDCO ची नवी टाऊनशिप कुठे? एकाच ठिकाणी असेल शाळा, हॉस्पिटल, कॉलेज अन् बरचं काही, जाणून घ्या आतली बातमी

Advertisement

या आधीही पालघरच्या वेगवेळ्या डेपोतल्या एसटी बसच्या प्रवाशांनी तक्रारी केल्या आहे. लोकल बसला तर नेहमी अडचणी येतातच. पण लाबं पल्ल्याच्या सोडल्या जाणाऱ्या बसला ही अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागला आहे. काही महिन्या पूर्वी तर एका धावत्या एसटी बसचे छप्परच उडाले होते. त्याचा व्हिडीओ ही जोरदार व्हायरल झाला होता. त्यामुळे आता तरी पालघरसाठी एसटी महामंडळाने चांगल्या बस द्यावा. प्रवाशांच्या जीवाशी खेळणं बंद करावं अशी मागणी जोर धरत आहे. त्यावर आता महामंडळ काय भूमीका घेतं हे पाहावं लागणार आहे.