संकेत कुलकर्णी, पंढरपूर:
Pandharpur Acid Attack: पंढरपुरमध्ये एका मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पंढरपुर शहरातील मध्यवस्तीत ही घटना घडली होती. अज्ञाताने ॲसिड हल्ला करुन पळ काढल्याचे पिडितने सांगितले होते, घटनेनंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र याप्रकरणात आता सर्वात धक्कादायक खुलासा झाला आहे. तरुणीने स्वत:च ॲसिड फेकून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ॲसिड हल्ला प्रकरणात खळबळजनक खुलासा!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंढरपुरात मुलीवरच्या ॲसिड हल्ल्याच्या घटनेबाबत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुलीने टॉयलेट क्लीनर चे ॲसिड विकत घेऊन स्वतःच अंगावर ओतून घेतले असल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे येते आहे. उपचारादरम्यान मुलीने तसा पोलिसांना प्राथमिक जबाब देखील दिला असल्याची माहिती आहे.
या घटनेमध्ये मुलीने स्वतःवरच ऍसिड ओतून कुणीतरी ऍसिड फेकले असल्याचा बनाव देखील केल्याचे बोलले जात आहे. याबाबत संबंधित तरुणीकडे उपचारादरम्यान समुपदेशन करत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे हल्ल्याआधी पिडितेने उपचारासाठी काही गोळ्या घेतल्या होत्या, त्याच्या गुंगीतून हा प्रकार घडला आहे का? याचाही तपास सुरु आहे.
Akola News: अकोल्यात 'या' ठिकाणी सुरु होता IPL चा सट्टा, 2 आरोपींनी पोलिसांना सांगितली आतली खबर