Pandharpur News : पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनासोबत एक आढावा बैठक घेतली आहे. मुंबई येथील वर्षा बंगल्यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांच्या उपस्थितीत पंढरपूर कॉरिडॉर येथील भूसंपादनासंदर्भात माहिती घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी वारी झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून पंढरपूर कॉरिडॉर संदर्भातली माहिती घेतली. सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांच्या कॉरिडॉर संदर्भातील शंका दूर करण्यासाठी तीन उपजिल्हाधिकारी पदाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे.
25 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत पंढरपुरातील कॉरिडॉर संदर्भात सर्व समावेश चर्चा होण्यासाठी अधिकारी दररोज भेटी-गाठी करीत आहेत. संबंधित उपजिल्हाधिकारी 25 ते 30 नागरिकांच्या गटाशी आज चर्चा करणार आहे. काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपुरात कॉरिडॉर निर्माण करण्याचे फडणवीस यांचे स्वप्न आहे. याबाबत नुकतीच मुंबईच्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी कॉरिडॉर विकास आराखडा समजून घेतला.
नक्की वाचा - Pandharpur News: पंढरपुरातील २१३ सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरे मिळणार, अजित पवारांची घोषणा
यानंतर आता पंढरपुरात प्रत्यक्ष 600 मालमत्ता अर्थात घरांचे भूसंपादन सुरू होणार आहे. यासाठी सरकारी पॅकेजची माहिती आणि नागरिकांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.येत्या 25 जुलै पासून अधिकारी नागरिकांची थेट चर्चा करणार आहेत. त्यामुळे पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाला गती येताना दिसत आहे.