Pandharpur News : पंढरपुरात भाविकांच्या भावनांशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपुरात चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून विक्री केली जात होती. या घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आलं आहे. पावसामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळी वाढ झाली असल्याने भाविकांना नदीत जाण्याची मनाई करण्यात आली आहे. त्याचा फायदा घेत भाविकांची फसवणूक केली जात आहे.
पंढरपुरात भाविकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार समोर आला आहे. भाविकांकडून पैसे घेऊन चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून विक्री केली जात आहे. मंदिर समितीकडे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकांनीच हा गोरखधंदा सुरू केल्याचं समोर आलंय. मंदिर परिसरातील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे.
नक्की वाचा - न केलेल्या कामासाठी 85 लाखांची बिलं, पालिका अधिकाऱ्याकडून नागरिकांची फसवणूक, प्रशासकांची मोठी कारवाई
पंढरपुरात बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून भाविकांच्या भक्तीचा सौदा केला जात आहे. बीव्हीजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षक चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून विक्री करत आहेत. चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महाद्वार घाटावरून नदीत उतरण्यास भाविकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. या ठिकाणी बॅरिकेटिंग लावून बिव्हीजी कंपनीचे कंत्राटी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत. मात्र हेच सुरक्षारक्षक नदीतील पाणी भाविकांना तीर्थ म्हणून विकत आहेत. त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.