Pandharpur News: गरिबांचा विठ्ठल झाला श्रीमंत! कार्तिकी वारीत विठ्ठलाच्या चरणी किती दान? आकडा आला समोर

शिर्डी असो की पंढरपूर भाविक हे भरभरून दान देत असतात.

जाहिरात
Read Time: 2 mins
सोलापूर:

संकेत कुलकर्णी 

गरिबांचा देव म्हणजे विठ्ठल. याच  विठ्ठलाच्या दर्शनासाठी भावीक जगाच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरात येत असता. विठ्ठलाचं एकदा तरी दर्शन घ्यावं ही या प्रत्येकाची इच्छा असते. वर्षातून एकदा का होईन ते पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनाला येत असता. तसे पाहीले तर वर्षाचे बार महिने भाविक हे विठ्ठलाच्या दर्शनाला हे येतच असतात. पण आषाढी आणि कार्तिक वारीमध्ये मात्र हा ओघ वाढलेला दिसतो. मोठ्या प्रमाणात भाविक हे पंढरपूरात येत असतात. यावेळी ते विठ्ठलाच्या चरणी दान ही करत असतात. यावेळच्या कार्तिक वारीतही भाविकांनी विठ्ठलाच्या चरणी भरभरून दान केलं आहे. 

नक्की वाचा - Emotional story: लेक अमेरिकेत, आई-बाबा गावी!, ती शिकली, मोठी झाली, चांगले दिवस येणार त्याच वेळी...

शिर्डी असो की पंढरपूर भाविक हे भरभरून दान देत असतात. पंढरपुरात नुकत्यात झालेल्या कार्तिकी वारीमध्ये विठ्ठलाच्या चरणी ही भरभरून दान आलं आहे. यावेळी दानपेटीत तब्बल 5 कोटी 18 लाख रुपयांचे दान आले आहे. यामध्ये देवाच्या चरणावर 48 लाख रुपये तर 33 लाख रुपयांच्या सोने चांदीच्या वस्तू विठ्ठल चरणी आले आहेत. तर इतर देणगी पुस्तके व मंदिराच्या विविध योजनातून बाकीचे दान आले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेजा यांनी ही माहिती दिली आहे. 

नक्की वाचा - जगातील सर्वात महागडा तांदूळ, किंमत 12 हजार 500 रूपये प्रति किलो, कुठे मिळतो माहित आहे का?

गतवर्षी कार्तिक यात्रेमध्ये तीन कोटी सत्तावन्न लाख रुपयांचे दान आले होते. यंदा मात्र एक कोटी 61 लाख रुपयांची भर विठ्ठलाच्या दानपेटीत पडली आहे. गेल्या वेळ पेक्षा यावेळी विठ्ठलाच्या चरणी मोठं दान आलं आहे.  त्यामुळे गरिबांचा देव असणारा विठ्ठल याच्या दानपेटीत वरचेवर कोटी न कोटी रुपयांची वाढ होताना दिसत आहे. ही भाविकांची श्रद्धा आहे. त्याच श्रद्धेपोटी ते विठ्ठलाच्या चरणी दान करत आहेत. या वर्षी हे दान वाढल्याचे समोर आले आहे.