मुलींनी शिकावं मोठं व्हावं आणि आपली अन् कुटुंबीची परिस्थिती सुधारावी असं प्रत्येक आई वडीलांना वाटतं. त्यासाठी ते वाट्टेल ते करण्यास तयार असतात. एक वेळ पोटाला चिमटा काढून ते जगतात. पै नं पै साठवतात. त्यातून मुलांना शिकवतात. त्यांना मोठं करतात. पण त्याच वेळी काही चुकीचं घडलं तर त्या कुटुंबावर, त्या आई वडीलांवर काय आभाळ कोसळत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. अशीच एक ह्रदयाला चटका लावणारी घटना घडली आहे. त्यामुळे सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे. ही बातमी ऐकून तुमच्या ही डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहाणार नाही.
राजलक्ष्मी (राजी) यारलागड्डा ही 23 वर्षांची तरुणी. ती मुळची आंध्रप्रदेशातली आहे. घरची परिस्थिती तशी तोलामोलाची. घरी गरिबीचे वातावरण पण तिला शिकण्याची जिद्द होती. मोठी स्वप्न होती. स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती अमेरिकेला गेली. आई वडीलांनी तिला मदत केली. राजलक्ष्मीने अमेरिकेच्या टेक्सास मधल्या ए अँड एम युनिव्हर्सिटी-कॉर्पस क्रिस्टीमधून पदवी मिळवली होती. पदवी मिळाल्याने ती खूशीत होती. आता नोकरी मिळेल आणि घरची स्थिती सुधारेल असा तिला विश्वास होता. त्यामुले ती सध्या टेक्सासमध्ये नोकरीच्या शोधात होती.
नक्की वाचा - Shah Rukh Khan Red Passport: शाहरुख खानला का मिळालाय लाल पासपोर्ट? काय आहे खासियत?
पण नियतीच्या मनात काही तरी दुसरचं होतं. आपल्या शेतकरी आई-वडिलांना मदत करण्याचं स्वप्न घेऊन आंध्र प्रदेशातून अमेरिकेला गेलेल्या एका 23 वर्षीय राजलक्ष्मीचा दुर्दैवी अंत झाला आहे. राजलक्ष्मी (राजी) यारलागड्डा असं तिचं पूर्ण नाव होतं. टेक्सासमधील तिच्या अपार्टमेंटमध्ये ती मृतावस्थेत आढळली. या बातमीने आंध्र प्रदेशातील तिच्या कर्मचेदु गावावर शोककळा पसरली आहे. आई-वडिलांच्या आशेचा दिवा असलेल्या राजलक्ष्मीच्या मृत्यूने तिचे कुटुंब आणि मित्र हादरून गेले. राजलक्ष्मीचे चुलत भाऊ चैतन्य वायव्हीके यांनी सांगितल्यानुसार, 7 नोव्हेंबर 2025 रोजी तिचा मृत्यू झाला.
धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तिला मोठ्या प्रमाणात खोकला आणि छातीत दुखत होतं. 7 नोव्हेंबरच्या सकाळी ती अलार्म वाजल्यावरही उठली नाही. तिच्या मित्रांना नंतर कळले की तिचा झोपेतच मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सध्या वैद्यकीय तपासणी सुरू आहे. राजलक्ष्मी ही आपल्या कुटुंबाची आशा आणि भविष्य होती. तिचे कुटुंब बापटला जिल्ह्यातील एका छोट्या शेतजमिनीवर उपजीविका करते. 'GoFundMe' वरील आवाहनात तिच्या चुलत भावाने भावनिक साद घातली आहे. तो म्हणाला, "राजीच्या अचानक जाण्याने कुटुंबावर केवळ दुःखाचा नाही, तर मोठ्या आर्थिक अडचणींचाही डोंगर कोसळला आहे." राजलक्ष्मीचे पार्थिव भारतात परत आणण्यासाठी आणि तिच्या गरीब कुटुंबाला मदत करण्यासाठी टेक्सासमध्ये निधी गोळा करण्याचे काम सुरू आहे. तिचे स्वप्न अपूर्ण राहिले, या घटनेने संपूर्ण भारत हळहळला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world