संकेत कुलकर्णी, पंढरपूर
Pandharpur News : पंढरपुरातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळख असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आणि आमदार अभिजीत पाटील यांची बदनामी थांबवण्यासाठी एका कथित कामगार नेत्याने चक्क 10 लाख रुपये खंडणी घेतली आहे. किरण घोडके असे तथाकथित कामगार नेत्याचे नाव आहे. किरण घोडके याला खंडणी घेताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे थेट आमदाराकडेच खंडणी मागितल्याची घटना पुढे आली आहे.
आमदार अभिजीत पाटील चेअरमन असणाऱ्या विठ्ठल सहकारी कारखान्याच्या कामगारांच्या लढ्यासाठी किरण घोडके गेले काही दिवस लढत होते. याच दरम्यान आपण कारखान्याची बदनामी करत नाही, त्या बदल्यात 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी किरण घोडके यांनी केली असल्याची माहिती पुढे आली.
(नक्की वाचा- Sanjay Raut : "दिल्लीत गुरु अमित शाहांचे चरण धुवून शिंदेंनी आशीर्वाद घेतले", संजय राऊतांचं ट्वीट चर्चेत)
यानंतर किरण घोडके यास 10 लाख रुपये खंडणी घेताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घोडके याची पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर विठ्ठल कारखान्याच्या कामगारांचे आंदोलन सुरू होते. यामध्ये किरण घोडके वारंवार कामगारांच्या बाजूने लढत होता.
(नक्की वाचा- Pune-Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? मंत्री दादा भुसेंनी दिली माहिती)
अशा स्थितीत किरण घोडके कामगारांचा अघोषित नेते बनला होता. याच किरण घोडके याला 10 लाखांची खंडणी घेताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत आमदार अभिजीत पाटील यांचे स्वीय सहाय्यक नितीन सरडे यांच्या फिर्यादीवरून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.