जाहिरात

Online Fraud: आमदार अभिजित पाटलांच्या कारखान्यात 1 कोटींची फसवणूक, सहकार क्षेत्रात खळबळ, प्रकरण काय?

Pandharpur Abhijit Patil News: धाराशिव येथील याच कारखान्यात एकाची तब्बल 1 कोटी दहा लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

Online Fraud: आमदार अभिजित पाटलांच्या कारखान्यात 1 कोटींची फसवणूक, सहकार क्षेत्रात खळबळ, प्रकरण काय?

संकेत कुलकर्णी, पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यामध्ये तब्बल एक कोटी दहा लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे सहकारक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील हे माढा- विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार असून त्यांचे पाच साखर कारखाने आहेत.  त्यांचा धाराशिव येथील चोराखळी येथेही एक कारखाना आहे. याच कारखान्यात एकाची तब्बल 1 कोटी दहा लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

चोराखळी येथील धाराशिव कारखान्याचे बाबासाहेब कचरू वाडेकर यांची फसवणूक झाली असून बँक खात्यावर ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करायला लावत त्यांना गंडा घालण्यात आला. या कारखान्याचे एमडी असलेले अभिजीत पाटील यांचे बंधु अमर पाटील असल्याचे भासवत त्यांची फसवणूक झाली.

( नक्की वाचा : Tanisha Bhise Case : दीनानाथ मंगेशकर नाही तर 'या' दोन हॉस्पिटलवर ससूनच्या अहवालात ठपका )

फसवणूक करणाऱ्यांनी अमर पाटील  यांचा फोटो डीपीला ठेवला होता. त्यामुळे बाबासाहेब कचरू वाडेकर फसले गेले. दरम्यान, याप्रकरणी धाराशिव सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधात सायबर पोलिसांकडून पथक तैनात करण्यात आली आहेत. या प्रकरणाने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असलेले अभिजीत पाटील यांनी पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली होती. मात्र ऐनवेळी महाविकास आघाडीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या अन् त्यांना माढ्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले. तिथेही त्यांनी बाजी मारत विधानसभेत एन्ट्री केली. 

(नक्की वाचा- नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, MIM च्या शहराध्यक्षासह 38 जणांना अटक)