जाहिरात

Pandharpur Palkhi Wari 2025 : माऊलींच्या पालखीचं वाल्हेतून प्रस्थान, नीरास्नानासाठी वारकऱ्यांमध्ये उत्साह

आज सकाळी साडेसहा वाजता माऊलींचा हा सोहळा नीरा नदीच्या काठावर दुपारच्या विसाव्यासाठी मार्गस्थ झाला आहे.

Pandharpur Palkhi Wari 2025 : माऊलींच्या पालखीचं वाल्हेतून प्रस्थान, नीरास्नानासाठी वारकऱ्यांमध्ये उत्साह

Pandharpur Palkhi Wari 2025 : श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी (Saint Dnyaneshwar Mauli Palkhi ) सोहळ्याने आज वाल्मीकीची नगरी असलेल्या वाल्हे नगरीचा निरोप घेत नीरा स्नानासाठी प्रस्थान ठेवले आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचा आजचा मुक्काम लोणंद येथे असणार आहे. तत्पूर्वी दुपारी हा विसावा नीरा नदीच्या काठावर विसरणार असून दुपारी माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये निरास्नान घातलं जाणार आहे. आज सकाळी साडेसहा वाजता माऊलींचा हा सोहळा नीरा नदीच्या काठावर दुपारच्या विसाव्यासाठी मार्गस्थ (Saint Dnyaneshwar Mauli Palkhi  Route) झाला आहे.

नीरा नदी काठावर असलेल्या दत्ता घाटावर माऊलींच्या पादुकांना पवित्र स्नान घातले जाईल. यानंतर हा पालखी सोहळा ज्यांनी पालखी सोहळ्याची सुरुवात केली त्या हैबत बाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात मार्गक्रमण करेल. सातारा प्रशासन या सोहळ्याचं नीरा नदी काठावर स्वागत करत तर पुणे जिल्हा प्रशासन त्यांना निरोप देईल. त्यानंतर हा पालखी सोहळा लोणंद मुक्कामी विसावेल. लोणंद येथे या पालखी सोहळ्याचा एक दिवस मुक्काम असेल. 

आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याचा भाग म्हणून, नीरा नदीच्या काठी, दत्त घाटावर हा सोहळा पार पडतो. या सोहळ्यात वारकरी मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात आणि 'ग्यानबा-तुकाराम' असा जयघोष करतात. माऊलींच्या पालखी सोहळ्याचा कालचा मुक्काम हा पुणे जिल्ह्यातील महर्षी वाल्मिकींच्या पुण्यभूमीत म्हणजे वाल्हे नगरीत होता.

संत तुकाराम महाराजांची पालखी 18 जून रोजी देहूतून आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जूनला आळंदीतून निघाल्या आहे. यापुढे केवळ विठ्ठलाचं नाव घेत ते पुढील कित्येक दिवस असाच पायी प्रवास करतील. मनात विठ्ठलाच्या दर्शनाची ज्योत तेवत ठेवत शेवटी 5 जुलै रोजी दोन्ही पालख्या पंढरपुरला पोहोचतील. 

नक्की वाचा - Wari News: तुकाराम महाराजांच्या पालखीने पार केला रोटी घाट, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाल्हेनगरीत

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी वेळापत्रक 2025 (Saint Dnyaneshwar Mauli Palkhi Route )

    • 19 /06/2025 माऊली पालखी प्रस्थान आळंदी
    • 20/06/2025 आळंदी ते पुणे, 29 कि.मी 
    • 21/06/2025 पुणे मुक्काम 
    • 22/06/2025 पुणे ते सासवड, 32 कि.मी
    • 23/06/2025 सासवड मुक्काम 
    • 24/06/2025 सासवड ते जेजुरी, 16 कि.मी
    • 25 /06/2025 जेजुरी ते वाल्हे, 12 कि.मी
    • 26 /06/2025 वाल्हे ते लोणंद, 20 कि.मी 
    • माऊलींना निरास्मान 
    • 27/06/2025 लोणंद ते तरडगाव, 08 कि.मी 
    • 28/06/2025 तरडगाव ते फलटण, 21 कि.मी 
    • 29/06/2025 फलटण ते बरड, 18 कि.मी 
    • 30/06/2025 बरड ते नातेपुते, 21 कि.मी 
    • बरड येथे गोल रिंगण
    • 01/07/2025 नातेपुते ते माळशिरस, 18 कि.मी 
    • सदाशिवनगर येथे गोल रिंगण
    • 02/07/2025 माळशिरस ते वेळापूर, 19 कि.मी 
    • खुडूस येथे गोळ रिंगण
    • 03/07/2025 वेळापूर ते भंडी शेगाव, 21 कि.मी 
    • ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा
    • 04/07/2025 भंडी शेगाव ते वाखरी, 10 कि.मी
    • बाजीराव विहीर येथे उभे रिंगण 
    • 05/07/2025 वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम
    • वाखरी येथे गोल रिंगण 
    • 06/07/2025 देवशयनी आषाढी एकादशी
    • 10 /07/2025 पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com