नजीर खान, प्रतिनिधी
Parbhani News : परभणी जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या 42 टक्के पाऊस जुलैमध्ये कमी झाला. त्याचा थेट परिणाम खरीप हंगामातील पिकांवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांनी पावसाअभावी माने टाकल्याची स्थिती आहे. तर दुबार पेरणी करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी आपत्कालीन पिकांकडे वळावं असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. कारण आता दुबार पेरणी केल्यास पिके येणार नाही. त्यामुळे आपत्कालीन पिकं असलेल्या सूर्यफूल, तीळ, बाजरी, तूर आंतरपीक एरंडी अधिक धने अशा प्रकारचे पिके घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
पाऊस समाधानकारक न झाल्याने पेरणी झालेली नाही. गेल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांनी वाट पाहिली, मात्र अद्याप राज्यातील अनेक भागात अपेक्षित पाऊस झालेला नाही. सर्वधारणपणे १५ जुलैपर्यंत कापूस, सोयाबीन आणि तूर याची लागवड घेत असतो. मात्र १५ जुलैपर्यंत चांगला पाऊस झाला नाही तर आपत्कालीन पिकं घेतली जातात. यापूर्वी २०१५ आणि दुष्काळी काळात काही भागात आपत्कालिन पिकं घेतली जातात.
नक्की वाचा - Nandurbar News : ऐन हंगामात बैल दगावला, पण मदत मिळेना; अखेर आदिवासी शेतकऱ्याने स्वतःला जुंपलं नांगराला
खरीप हंगाम हातातून जाण्याची स्थिती...
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर खरीप हंगाम हातातून जाण्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. आता अशी स्थिती आहे की, दुबार पेरणी होणार नाही. त्यामुळे हंगाम हातातून जाणार असल्याचं शेतकरी सांगत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. परभणी जिल्ह्यात तीन लाख 58 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपची पेरणी केली जाते. परभणी जिल्ह्यात यंदा जुलैपर्यंत 42 टक्के कमी कापूस झाला. प्रत्येक वर्षी 230 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस होत होता. मात्र यावर्षी 133 मिलीमीटर प्रत्यक्षात पाऊस झालेला आहे. त्यात सतत दोन आठवडे पाऊस झाला नसल्याने पिकांनी मान टाकली आहे. परभणी जिल्ह्यात 3 लाख 58 हजार हेक्टरवर खरीपची पेरणी झालेली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम हातातून जाण्यासारखी स्थिती निर्माण झाल्याचं शेतकरी सांगत आहेत. जुलै महिना अर्धा संपल्याने आता दुपार पेरणी शक्य नसल्याचं शेतकरी सांगत आहेत.
एका शेतकऱ्याने ५ एकर जमिनीवर जूनमध्ये सोयाबीन पेरलं होतं. मात्र जुलै १३ मध्ये संपूर्ण पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. रोपं माना टाकत आहे. रोप जमिनीतून बाहेर योग्य पद्धतीने निघालेलं नाही. पाऊस न झाल्याने ५० टक्के बियाणे कुजून गेलं आहे. पाऊस झाला नाही, त्यात वेगळही निघून गेल्याने शेतकरी दुपार पेरणीही करू शकत नाही. गेल्या वर्षी याच शेतातील २५ क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न निघालं होतं. मात्र यंदा सर्व हातातून गेल्याची हतबलता शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.