जाहिरात

Parbhani News : भूकंप, ज्वालामुखी की आणखी काही, परभणीतल्या शेतातून वाफ येण्याचं कारण समजलं!

Parbhani Smoke : परभणी जिल्ह्यातल्या  पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे या गावात मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं वाफ येत होती.

Parbhani News : भूकंप, ज्वालामुखी की आणखी काही, परभणीतल्या शेतातून वाफ येण्याचं कारण समजलं!
परभणी:

दिवाकर माने, प्रतिनिधी

Parbhani Smoke : परभणी जिल्ह्यातल्या  पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे या गावात मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं वाफ येत होती. अचानक वाफ येत असल्यानं जमिनीखाली ज्वालामुखी तर नाही ना? असा प्रश्न शेतकी विचारत होते. त्यानंतर गावात वेगवेगळ्या अफवा मोठ्या प्रमाणावर पसरल्या होत्या. 

'NDTV मराठी' नं शोधलं कारण

जमिनीतून अचानक वाफ येण्याचं कारण काय? याचा शोध 'NDTV मराठी' नं घेतला. त्यावेळी  परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान (Soil Department) विभागाचे प्रमुख डॉ. कौसिडकर यांनी या घटनेचं नेमकं कारण सांगितलं आहे. 

Dadar kabutar Khana: दादर पुन्हा तापणार? मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस

( नक्की वाचा : Dadar kabutar Khana: दादर पुन्हा तापणार? मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस )

जमिनीतून वाफ येण्याची 3 प्रमुख कारणं असल्याचं डॉ. कौसिडकर यांनी सांगितलं. 

1. जमिनीत रासायनिक अभिक्रिया (chemical reaction),
2. जमिनीमध्ये आढळून आलेली मुक्त चुलखडी (calcium carbonet) साठा, किंव्हा कालांतराने एका जागी जमा झालेला यासाठ्या मुळे वाफ येण्याची शक्यता.
3. अति सेंद्रिय, 'ना कुजलेले पदार्थ' आणि दूषित पाण्यामुळे देखील ही वाफ येऊ शकते, उदाहरण: एखादा प्राणी पुरलेल्या ठिकाणी त्याचा शव क्षिण (Decay) होतं असल्या मुळे देखील रासायनिक अभिक्रिया होऊन वाफ बाहेर येऊ शकते, असं डॉ. कौसिडकर यांनी स्पष्ट केलं. 

शेतकऱ्यांनी घाबरण्याचं काहीही कारण नाही. जमिनीतून अचानक वाफ येणे हा भूकंप किंवा ज्वालामुखीचा प्रकार नाही तर रासायनिक अभिक्रियेचा परिणाम आहे, असं डॉ. कौसिडकर यांनी स्पष्ट केले. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com