जाहिरात

Pavanraje Nimbalkar: 'माफीचा साक्षीदार फितूर', पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात कोर्टाचं मोठे विधान

या निकालाची भिस्त माफीच्या साक्षीदारावर आहे  आणि त्याचा जबाब संदिग्ध आहे. या प्रकरणात बेस हा ठिसूळ झालेला आहे. तसेच साक्षीदार फितूर झाला आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. 

Pavanraje Nimbalkar: 'माफीचा साक्षीदार फितूर', पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात कोर्टाचं मोठे विधान

Pavanraje Nimbalkar Murder Final Verdict:  संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या  पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल मुंबईतील न्यायालयात जाहीर होत आहे. ३ जून २००६ रोजी कळंबोलीजवळ पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आज या हत्याप्रकरणाचा निकाल लागत असून कोर्टाने निकाल वाचणात माफीच्या साक्षीदाराबाबत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे.

कोर्टाने काय म्हटलं? 

यात दोन प्रकाराच्या केस आढळल्या आहेत, माफीचा साक्षीदार रीलायबल नसेल तर पुढची तपासणी करणे गरजेचे नाही,  तो रिलायबल असेल तर पुढे तपासणी करणे गरजेचे आहे.  न्यायालयाने सर्व ऊहापोह केलेला आहे, फक्त माफीचा साक्षीदार याची तपासणी न करता सर्व ऊहापोह केलेला आहे. माफीचा साक्षीदार आला कसा? त्याला अटक झाली कशी? त्याचे जबाब काय घेतले. पारसमल जैन हा माफीचा साक्षीदार आहे. फक्त माफीच्या साक्षीदार नाहीतर खटल्याचा सगळ्या साक्षीपुराव्यांच्या आधारे ऊहापोह केला. 

क्राइम ब्राँचने त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल केले, त्याची पोलिस कोठडी घेतली. त्याचे औषध बंद करण्यात आली होती, त्याला मारहाण करण्यात आली होती,. त्यानंतर त्याने साक्ष दिली मग त्याला मारहाण बंद झाली. त्याला मारहाण करून कबुली जबाब घेतला. या निकालाची भिस्त माफीच्या साक्षीदारावर आहे  आणि त्याचा जबाब संदिग्ध आहे. या प्रकरणात बेस हा ठिसूळ झालेला आहे. तसेच साक्षीदार फितूर झाला आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. 

तसेच  माफीच्या साक्षीदाराची मोठ्या प्रमाणात जंगम मालमत्ता आहे, मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आहेत. साडेचार किलो सोन्याचे भांडवल होते, ३० किलो चांदीचे भांडवल होते. माफीच्या साक्षीदाराची बरीच संपत्ती. इतकी संपत्ती असलेली व्यक्ती ५० हजारांसाठी काही करेल असं वाटत नाही, असे म्हणत कोर्टाने माफीच्या साक्षीदाराबाबत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com