Pavanraje Nimbalkar Murder Case Verdict: संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा तब्बल २० वर्षांनी निकाल लागला. कोर्टाने पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता केली आहे. माफीचा साक्षीदार ठरलेल्या पारसमैल जैन याची साक्ष ग्राह्य नसल्याचा दाखला देत सढळ पुराव्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या निकालाने ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने आरोपींना निर्दोष मुक्त केल्यानंतर त्यांनी मोठी प्रतिक्रिया देत आपल्या शिंदे गटातील प्रवेशावर महत्त्वाचं विधान केले आहे.
Pavanraje Nimbalkar: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण: पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
काय म्हणाले ओमराजे निंबाळकर?
"निकालानंतर मी एवढेच म्हणेन कलयुग आहे. या निर्णयाविरोधात मी हायकोर्टात दाद मागणार आहे. शिवसेना शिंदे गटात जाण्याबाबत माझा निर्णय अद्याप झालेला नाही. मी माझ्या मतदारसंघात जाणार आहे. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहे आणि त्यानंतर माझा निर्णय जाहीर करणार आहे. अशी मोठी आणि महत्त्वाची प्रतिक्रिया ओमराजेंनी दिली आहे. तसेच कोर्टाचा निकाल आणि माझा पक्षप्रवेश याचा काही संबंध नाही, निकालावर काही अवलंबून नाही," असंही ओमराजेनी म्हटलं आहे.
ओमराजे निंबाळकर यांच्या या प्रतिक्रियेने ठाकरे गटाच्या फुटलेल्या आमदारांची धाकधुक चांगलीच वाढली आहे. जर ओमराजेंनी पक्ष सोडण्यास नकार दिला तर संपूर्ण ऑपरेशन टायगर फेल ठरणार आहे. हे ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी ओमराजेंंनी शिंदे गटात प्रवेश करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
DCM शिंदेंची गृहमंत्र्यांशी चर्चा
दुसरीकडे, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात CBI वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्दोष मुक्तीच्या निकालाविरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) वरिष्ठ न्यायालयात अपील करणार आहे. या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. या चर्चेनंतर अमित शाह यांनी CBI ला निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
UBT Crisis: 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो! बंडखोर खासदारांचा शाही थाट; नेमका मुक्काम कुठे?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world