Pawanraje Nimbalkar Murder Case Verdict: संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल मुंबईतील न्यायालयात जाहीर झाला आहे. या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य पुरावा असलेल्या माफीची साक्षीदाराची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरली नाही. ही साक्ष खोटी असून माफीच्या साक्षीदाराने दिलेल्या जबाबात मोठी तफावत आहे, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवले ज्यामुळे हा संपूर्ण खटला फिरला.
३ जून २००६ रोजी कळंबोलीजवळ पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. सुनावणीदरम्यान १२८ साक्षीदार तपासण्यात आले असून अनेक राजकीय आणि गुन्हेगारी धागेदोरे समोर आले होते. तब्बल वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यातील अंतिम निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
याआधी या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले पद्मसिंह पाटील आणि अन्य एक आरोपी प्रकृती बरी नसल्याचे कारण देत मागच्या झालेल्या सुनावणीच्या वेळी गैरहजर होते. त्यानंतर सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मागच्या सुनावणीत सर्व आरोपी हजर झाल्यानंतर कोर्टाने निकालाचा अभ्यास करण्यासाठी आजची तारीख दिली होती. आज पद्मसिंह पाटील हे व्हिलचेअरवर कोर्टात हजर होते.
UBT Crisis: 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो! बंडखोर खासदारांचा शाही थाट; नेमका मुक्काम कुठे?
कोर्टाने काय म्हटलं? वाचा संपूर्ण निकाल
यावेळी निकालाच्या वाचनामध्ये न्यायाधीश एस.आर.नावंदर म्हणाले की, एका लोकनेत्याची हत्या होते ही दुर्दैवी गोष्ट आहे. या संपूर्ण प्रकरणाचा प्राथमिक तपास कळंबोली पोलिसांनी केला. त्यानंतर सीबीआयने चांगला तपास केला. ही घटना दुर्दैवी होती. अनेक सरकारी वकील बदलले, इथपर्यंत प्रवास आला. या प्रकरणात १२७ साक्षीदार तपासले गेले. आरोपी ४ ने माफीचा साक्षीदार होण्याचे ठरविले, तो साक्षीदार झाला. आता निकालापर्यंत ही फाईल आली आहे.
कोणतेही कोर्ट कायद्याच्या चौकटीत राहून निकाल देतो. ओमराजे निंबाळकर, राणी देवी यांचे बऱ्यापैकी पुरावे होते. माफीच्या साक्षीदारावर आधारीत हा संपूर्ण खटला होता. पवनराजे आणि पद्मसिंह पाटील यांच्यात धुसफूस होती हे दिसून आले आहेत. त्यांच्यात राजकीय वैमनस्य झालेलं होते. साखर कारखान्यांचा वाद होता, बऱ्याच केसेस होत्या. राजकीय वैमनस्य निर्माण झाले होते, त्याचा पुरावा आहे.
मयताने माझ्या जीवाला धोका अशी तक्रार केलेली नाही, त्यामुळे असे दिसून येत नाही. यात दोन प्रकाराच्या केस आढळल्या आहेत, माफीचा साक्षीदार रीलायबल नसेल तर पुढची तपासणी करणे गरजेचे नाही, तो रिलायबल असेल तर पुढे तपासणी करणे गरजेचे आहे. न्यायालयाने सर्व ऊहापोह केलेला आहे, फक्त माफीचा साक्षीदार याची तपासणी न करता सर्व ऊहापोह केलेला आहे. माफीचा साक्षीदार आला कसा? त्याला अटक झाली कशी? त्याचे जबाब काय घेतले. पारसमल जैन हा माफीचा साक्षीदार आहे. फक्त माफीच्या साक्षीदार नाहीतर खटल्याचा सगळ्या साक्षीपुराव्यांच्या आधारे ऊहापोह केला.
क्राइम ब्राँचने त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल केले, त्याची पोलिस कोठडी घेतली. त्याचे औषध बंद करण्यात आली होती, त्याला मारहाण करण्यात आली होती,. त्यानंतर त्याने साक्ष दिली मग त्याला मारहाण बंद झाली. त्याला मारहाण करून कबुली जबाब घेतला. या निकालाची भिस्त माफीच्या साक्षीदारावर आहे आणि त्याचा जबाब संदिग्ध आहे. या प्रकरणात बेस हा ठिसूळ झालेला आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे.
ओमराजेंची मोठी प्रतिक्रिया
या निकालाआधी आणि पक्षफुटीवर ओमराजे निंबाळकरांची सर्वात पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. "या निकालाचा आणि राजकीय घडामोडींचा काही संबंध नाही. गेल्या 20 वर्षांपासून आम्ही या निकालाची प्रतीक्षा करत आहोत असं ओमराजेंनी म्हटलं आहे. न्यायालयाचा निकाल हा त्यांच्यासमोर असणाऱ्या साक्षी पुराव्यांच्या आधारे होईल. असं असतं तर 2022 मध्येच शिदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला असता असं म्हणत त्यांनी निकालावरुन होत असलेले आरोपही फेटाळून लावले आहेत.
Pavanraje Nimbalkar: 'माफीचा साक्षीदार फितूर', पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात कोर्टाचं मोठे विधान
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world