Pune Crime: धाराशिवमधील मृतदेहाचं पुणे कनेक्शन.. अफेयर, लग्नाचा तगादा अन् हत्या, भयंकर मर्डर मिस्ट्री

राणीच्या या  त्रासाला कंटाळून अनिकेतने तिचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने राणीला तुला  गाव ठेवतो असेही सांगितले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पुणे:

Pimpri Chinchwad Crime: धाराशिवमध्ये एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या हत्याकांडाचे आता पिंपरी चिंचवड कनेक्शन समोर आले आहे. अनैतिक संबंध आणि लग्नासाठी तगादा लावल्याने या महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

विवाहबाह्य संबंध... लग्नाचा तगादा अन् हत्या!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहरातून पळवून नेलेल्य एका महिलेचा धाराशिवमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. या मृतदेहाचे कोडं आता उलगडले असून वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राणी विशाल गायकवाड असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे तर अनिकेत महादेव कांबळे असं आरोपीचे नाव आहे. 

Pune News: अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून! पुण्यात चुलत भावानेच दिली 4 लाखांची सुपारी

पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या राणी आणि अनिकेत यांचे अनैतिक संबंध होते. दोघेही विवाहित असून दोघांच्याही घरी त्यांच्या संबंधांची कल्पना होती. त्यामुळेच राणी अनिकेतला सोबत राहण्यासाठी तगादा लावत होती. राणीच्या या  त्रासाला कंटाळून अनिकेतने तिचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने राणीला तुला  गाव ठेवतो असेही सांगितले. 

गळा दाबून संपवलं

अनिकेतने 26 नोव्हेंबरला राणीला गाडीत बसवून गावी जायच्या बहाण्याने थेट धाराशिवला नेले.  27 नोव्हेंबरच्या पहाटे गाडीतच राणीचा गळा दाबून आणि रोडने डोक्यात मारहाण करून खून केला. राणीचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून त्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. हा मृतदेह सापडल्यानंतर ढोकी गावाजवळील स्थानिक पोलिसांनी तक्रार दाखल केली होती.

Advertisement

(नक्की वाचा- Holiday in Maharashtra: महाराष्ट्रात 2 डिसेंबरला पगारी सुट्टी; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय)

दुसरीकडे पुण्यातही राणीच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार वाकड पोलिस ठाण्यात नोंद केली होती. राणीचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर अनिकेतवर संशय आल्यानंतर त्याची चौकशी पोलिसांनी केली. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या आणि तांत्रिक पुरावे दाखवताच तो वठणीवर आला. पोलिसांच्या चौकशीतून अनिकेतने आपल्या गुन्ह्याचा कबुली नामा दिला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.