जाहिरात

Pink Village: पिंक सीटी नाही तर पिंक व्हिलेज! 'या' एकमेव पिंक गावाची वैशिष्ट्ये तुम्हाला माहीत आहेत का?

बायोगॅस प्रकल्प राबवणारं आणि 100% सौर उर्जेवर चालणारं जिल्ह्यातील पहिलं गाव म्हणून शेळकेवाडी गावाची ओळख निर्माण झाली आहे.

Pink Village: पिंक सीटी नाही तर पिंक व्हिलेज! 'या' एकमेव पिंक गावाची वैशिष्ट्ये तुम्हाला माहीत आहेत का?
कोल्हापूर:

विशाल पुजारी 

जयपूरची पिंकसिटी ही ओळख सर्वांनाच माहिते आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यातही असं एक गाव आहे, ज्या गावाची नवी ओळख निर्माण झाली आहे. जिल्ह्यात या गावाची चर्चा सध्या सगळीकडेच आहे. कारण हे गाव गुलाबी आहे. विशेष म्हणजे गाव फक्त गुलाबी रंगासाठीच नाही तर इतरही काही उपक्रमांमुळे चर्चेत आहे. घरोघरी सोलर पॅनल बसवून कोल्हापुरातल्या या पिंक व्हिलेजने एक आदर्श सर्व गावां समोर ठेवला आहे. गुलाबी रंग म्हणजे धैर्याच, महिला सबलीकरणाच अन् आनंददायी वातावरण निर्माण करणाऱ्या ऊर्जेचं प्रतिक समजलं जातं . याच गुलाबी रंगाने नटलेल्या कोल्हापुरातल्या शेळकेवाडी या  गावाची पिंक व्हिलेज अशी ओळख निर्माण झाली आहे.  कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं शेळकेवाडी हे गाव आहे. गावची लोकसंख्या जेमतेम पाचशेच्या आसपास आहे. गेल्या अनेक वर्षापासून गावानं अनेक पर्यावरण पूरक उपक्रम राबवले आहेत. नुकताच गावानं सौर ऊर्जेच उपक्रम राबवून राज्यात छाप पडली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गावात प्रवेश करताच सगळी घरं गुलाबी रंगांची दिसतात. महिला सबलीकरणाच प्रतीक म्हणून घरांना गुलाबी रंग देण्यात आला आहे. प्रत्येक घर हे आकर्षक आणि टुमदार दिसतं. घरासमोर लावलेली झाडं ही आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरतात. विशेष म्हणजे इथल्या प्रत्येक घरावर सुविचार बघायला मिळतात. घरातील कर्त्या पुरुषासोबत साथ देणाऱ्या महिला भगिनींचं नाव हे प्रत्येक घरावर दिसतं. गावातील स्वच्छता तर अगदी डोळ्यात भरणारी आहे. आता या सगळ्या पलीकडे जाऊन गावानं नवीन उपक्रम राबवलाय. हा उपक्रम आहे सौर ऊर्जेचा. गावानं शंभर टक्के सोलर पॅनल बसवून स्वतःची विजनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - पतीच्या दाढीची अडचण, पत्नीने थेट क्लिन शेव्ह करणाऱ्या दिरासोबत जुळवलं सूत अन् झाली फुर्रर्रर्रssss

शेळकेवाडी या पिंक व्हिलेजने गावातल्या प्रत्येक घरावर इतकंच नाही तर शाळा, मंदिर अन पिठाच्या गिरणीवर सोलर पॅनल बसवले आहेत. घरटी पाच हजार रुपये घेऊन लाखो रुपयांचा प्रकल्प राबवणारं हे गाव आहे. गावात जो प्रकल्प राबवला आहे, त्या  प्रत्येक सोलरला 68 हजार इतका खर्च आला.  तरी प्रत्येकी पाच हजार रुपये घेण्यात आलेत. उर्वरित रक्कम ही गावाला मिळालेल्या बक्षीस आणि अनुदानातून भरलेली आहे. अत्यंत छोटं गाव असल्याने निधीची कामतरता असते. तरी देखील हा उपक्रम राबवला असं ग्रामसेवक सुरेखा आव्हाड यांनी सांगितलं. तर गावची लोकसंख्या 498 इतकी आहे. गावचं वार्षिक उत्पन्न कमी असल्यामुळे आमचं गाव विविध अभियानात भाग घेत असतं असं सरपंच तेजश्री शेळके यांनी सांगितलं.

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: पहलगाम हल्ल्याचा मोठा पुरावा लागला हाती, पाकिस्तानचं थेट कनेक्शन आलं समोर

या मधीलच एका अभियानात आम्हाला 50 लाखाचे बक्षीस मिळालं आहे असं ही त्यांनी सांगितलं. यातले 35 लाख रुपये आम्ही सोलर प्रकल्पासाठी वापरले आहेत. गावाकऱ्यांनी आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झालं. गावची ओळख पिंक व्हिलेज अशी आहे.  गावातली सगळी घर महिलांच्या नावावर आहेत. गावात महिला सबलीकरणसाठी विशेष प्रयत्न केले जातात, असं ही त्या म्हणाल्या. तर या गावातील युवक ही याबाबत बोलता.  एक युवक म्हणून गावाचा अभिमान वाटतो. गावात जे नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. यापूर्वी देखील अनेक उपक्रम राबवले गेलेले आहेत. वरिष्टानी दिलेला आदर्श असाच पुढे चालवू असा मानस ही त्याने व्यक्त केला आहे. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - Big News: महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन करताय? थांबा! त्या आधी ही बातमी नक्की वाचा

बायोगॅस प्रकल्प राबवणारं आणि 100% सौर उर्जेवर चालणारं जिल्ह्यातील पहिलं गाव म्हणून शेळकेवाडी गावाची ओळख निर्माण झाली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये गावाचा सहभाग असतो. अनेक स्पर्धामध्ये बक्षीसही गावाने  मिळवली आहेत. गेली पस्तीस वर्षे या गावात मी कार्यरत आहे असं एक अंगणवाडी सेवीका सांगतात. अनेक पर्यावरणपूरक प्रकल्प इथं राबवले गेले आहेत. गावात झाडे लावा झाडे जगवा असा उपक्रम राबवला गेला आहे. गावातल्या प्रत्येक चौकात, प्रत्येक घरावर सामाजिक संदेश आहे. बायोगॅसनंतर आता गावात राबवलेला सौर ऊर्जा प्रकल्प हा एक आदर्शच आहे. त्यामुळेच पिंक व्हिलेज म्हणून ओळख असलेलं शेळकेवाडी हे गाव आता जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आकर्षण ठरतंय.