मुंबई: पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे भारतीय नौदलाच्या तीन महत्त्वाच्या युद्धनौका - आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वाघशीर पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्यात आले. पंतप्रधान मोदींसह देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारही यावेळी उपस्थित होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
15 जानेवारी सेना दिन म्हणूनही साजरा केला जातो. भारत भूमीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक विराला मी नमन करतो. भारतमातेच्या रक्षणात असलेल्या प्रत्येक जवानाला शुभेच्छा देतो. आज भारताचे गौरवशाली समुद्री साम्राज्य आणि आत्मनिर्भर भारतासाठीही मोठा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही नौदलाला नवी शक्ती नवा मार्ग दिली होती. त्यांच्याच पावन धरतीवर २१ दशकातील नौदलाला अधिक सशक्त बनवण्यासाठी मोठे पाऊल उचलत आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
तसेच एकाच वेळी युद्धनौका, पाणबुडींचे लोकार्पण होत आहे. या सर्व युद्धनौका मेड इन इंडिया आहेत, ही अभिमानाची बाब आहे. भारतीय नौदलाला, या नौका निर्माण करणाऱ्या कामगारांना, अभियंत्यांना शुभेच्छा देतो. आजचा कार्यक्रम आपल्या भविष्यातील आकांक्षांना जोडतो. जगभरात भारताचे सामर्थ्य वाढत असून भारत हा विस्तारवाद नाही तर विकासवादाच्या भावनेने काम करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.
( नक्की वाचा : Sharad Pawar vs Amit Shah : शरद पवार अमित शाहांना हिणवतात 'ते' प्रकरण काय आहे? )
निलगिरी ही चौल वंशाच्या समुद्री सामर्थ्यासाठी समर्पित आहे. सूरत वॉरशीप ही भारत आणि आशियाशी जोडलेला होता त्या कालखंडाची आठवण करुन देते. काही वर्षापूर्वी मला पहिल्या सबमरीनमध्ये सामील होण्याची संधी मिळाली होती. आता मला या क्लासच्या सहाव्या पाणबुडीचे उद्घाटन करण्याचं भाग्य मिळालं. असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
गेल्या 10 वर्षात अनेक मोठे निर्ण झाले, ज्यामुळे भारत हा जगासाठी दिशादर्शक देश बनत चालला आहे. जगभरात भारताचे सामर्थ्य आणि विश्वासहार्तता वाढत आहे. देश फक्त विस्तारवाद नव्हेतर विकासवादावर भर देत आहे. आमच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला मोठा निर्णय म्हणजे महाराष्ट्रातील वाढवण बंदर. 75 हजार करोड रुपयांच्या या आधुनिक पोर्टचे काम सुरु झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात हजारो रोजगार निर्माण होतील, असं आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world