जाहिरात

Pune Richest Candidate: पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार! हा 'आमदार'पुत्र कोट्यवधींचा मालक; संपत्ती किती?

PMC Election 2026 Richest Candidate: पुणे महापालिकेत यावेळेस दिवंगत खासदार, आमदार आणि आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी देण्यात आली आहे.

Pune Richest Candidate: पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार! हा 'आमदार'पुत्र कोट्यवधींचा मालक;  संपत्ती किती?

PMC Election 2026 Richest Municipal Election Candidate: पुण्यामध्ये सध्या महानगरपालिका निवडणुकीचा धुरळा सुरु आहे. उमेदवारी, एबी फॉर्म, नाराजीनाट्य असा अभूतपूर्व राडा पाहायला मिळाल्यानंतर अखेर पुणे महानगरपालिकेसाठी सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. पुणे महानगरपालिकेसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची संपत्तीही आता समोर आली आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे भाजपमध्ये असलेले चिरंजीव सुरेंद्र पठारे हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. 

आमदार पुत्राकडे 271 कोटींची संपत्ती...! 

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या मुला-सुनांच्या संपत्तीचा तपशील समोर आला असून, यामध्ये वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी श्रीमंतीत बाजी मारली आहे. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार, सुरेंद्र पठारे यांची एकूण मालमत्ता २७१ कोटी ८५ लाख रुपये इतकी आहे.

PMC Election 2026: उमेदवारीवरुन कलह! पठ्ठ्याने एबी फॉर्म गिळून विषयच संपवला, पुण्यात काय घडलं?

​पुणे महापालिकेत यावेळेस दिवंगत खासदार, आमदार आणि आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी देण्यात आली आहे. या 'हाय-प्रोफाईल' उमेदवारांमध्ये बहुतांश उमेदवार कोट्यधीश आहेत.  यामध्ये सुरेंद्र पठारे यांच्या नावावर सर्वाधिक संपत्ती असल्याचे समोर आले आहे. यांच्याकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज आणि इनोव्हा क्रिस्टा यांसारख्या महागड्या गाड्यांचा ताफा असून त्यांचे शिक्षण बी.टेक. झाले आहे.

सुरेंद्र पठारे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता २७१ कोटी ८५ लाख २१ हजार ८७७ रुपये इतकी असून, यात प्रामुख्याने स्थावर मालमत्तेचा मोठा वाटा आहे. ​पठारे कुटुंबाच्या स्थावर मालमत्तेचे मूल्य २१७ कोटी ९३ लाख ४ हजार ८८७ रुपये इतके नोंदवण्यात आले आहे. यामध्ये जमिनी, व्यावसायिक इमारती आणि निवासी मालमत्तांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पठारे यांच्यावर सार्वजनिक वित्तीय संस्थांचे आणि इतर देणी मिळून एकूण ४६ कोटी ५९ लाख ८९ हजार २६२ रुपये इतके कर्ज आहे.

रमेश वांजळेंच्या कन्येकडे 77 कोटींची संपत्ती...! 

दुसरीकडे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे या देखील रिंगणात असून, वांजळे कुटुंबाची मालमत्ता ७७ कोटी ६५ लाख रुपये इतकी आहे. दुसरीकडे, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांची कौटुंबिक मालमत्ता ११ कोटी २२ लाख रुपये आहे.

Pune News : पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीला मोठा धक्का, करिष्मा बारणेंसह या उमेदवारांचे AB फॉर्म रद्द, कारण काय?

विशेष म्हणजे स्वरदा बापट या उच्चशिक्षित (एलएलएम) असून त्यांनी यापूर्वी सांगली महापालिकेची निवडणूकही लढवली आहे. ​या निवडणुकीत कुणाल टिळक, चंद्रशेखर निम्हण, रवींद्र धंगेकर यांच्यासह अनेक प्रस्थापितांच्या वारसदारांचे भवितव्य पणाला लागले आहे. या उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमुळे पुण्यातील राजकारणात सक्रिय असलेल्या कुटुंबांची आर्थिक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com