रेवती हिंगवे, प्रतिनिधी
पुण्यामधील (Pune News) बुधवार पेठे तसं अनेकांना माहिती आहे. देहविक्रय व्यवसायाची ओळख असलेल्या बुधवार पेठेबाबत गुन्हेगारीचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. बुधवार पेठेच्या नावाखाली ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेत गेलेल्या एका तरुणाने दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी बुधवार पेठेत गेला असता या दोन तरुणांनी त्याचा पाठलाग केला. यानंतर ते त्याच्या घरापर्यंतही पोहोचले. यानंतर आम्ही तुम्हाला ऑनलाइन 20 हजार देतो. तुम्ही कॅश द्या अशी बतावणी करीत पैसे द्या अन्यथा आम्ही तुमची बदनामी करू अशी धमकी दिली. (pune budhwar peth)
नक्की वाचा - Shocking News : पुण्याहून परभणीला निघालेलं युगुल; अचानक नवजात बाळाला धावत्या बसमधून दिलं फेकून, प्रवासी हादरले!
नेमकं काय आहे प्रकरण?
आम्हाला पैसे द्या, अन्यथा तुम्ही बुधवार पेठेत गेला होता अशी तुमची बदनामी करू असं म्हणत फिर्यादीला धमकी दिली. आरोपींनी एवढ्यावरच न थांबता पोलीस हेल्पलाइन 112 या नंबरवर कॉल केला आणि पोलिसात तक्रार द्यायला सुरुवात केली. आमच्याकडून वीस हजार रुपये घेऊन आमची फसवणूक केल्याचं आरोपींनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर नांदेड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली. त्यानंतर नेमका प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. आरोपी बुधवार पेठेच्या नावाखाली फिर्यादीची फसवणूक करीत होते हे लक्षात आल्यानंतर दोघांना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली. आयुष राजू चौगुले, सदफ पठाण अस अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.