Dharashiv News :रात्री 12 वा. कलाकेंद्रावर धाड, बंद खोलीत सुरू होता धक्कादायक प्रकार, 5 केंद्रांवर मोठी कारवाई

धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांवर अखेर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांवर अखेर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील एका माजी उपसरपंचाने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. तो कलाकेंद्रामधील एक मुलीच्या प्रेमात अडकला होता. तिचा दुरावा सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना ताजी असताना धाराशिव जिल्ह्यातील पाच कला केंद्रावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

वाशी तालुक्यातील वादग्रस्त तुळजाई लोकनाट्य कला केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांनी कायमस्वरूपी रद्द केल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासन सजग झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच कला केंद्रांवर धाड टाकली. या छापेमारीत नियमभंगाचे धक्कादायक प्रकार उघड झाले असून संबंधित केंद्रचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नक्की वाचा - Beed Crime : कोण आहे पूजा गायकवाड? जिच्या प्रेमात अडकून विवाहित माजी उपसरपंचाने संपवलं जीवन

ही कारवाई मध्यरात्री बाराच्या सुमारास करण्यात आली. यामध्ये धाराशिव तालुक्यातील आळणी येथील साई आणि पिंजरा या कला केंद्रांवर तर चोराखळी पाटी येथील गौरी, कालिका आणि महाकालिका या केंद्रांवर छापे टाकण्यात आले. याआधी याच चोराखळीतील महाकाली कला केंद्रात महिनाभरापूर्वी गोळीबाराची घटना देखील घडली होती. त्यामुळे हे कला केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Advertisement

धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या कलाकेंद्रांवर छापे टाकले असून नियमानुसार कलाकारांसाठी स्टेजवर नृत्याची व्यवस्था करणे बंधनकारक असताना, या ठिकाणी बंद खोलीत रात्री उशिरापर्यंत नृत्य सुरू असल्याचे समोर आले. तसेच नियमांना डावलून रात्री उशिरापर्यंत ही कला केंद्र सुरू असल्याची चर्चा आहे. या बेकायदेशीर प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्येही तीव्र नाराजीच वातावरण आहे. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 188 (नवीन भारतीय न्याय संहिता कलम 223) अंतर्गत गुन्हे दाखल केले असून पुढील चौकशी सुरू आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर केंद्रचालकांचे धाबे दणाणले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.