58 minutes ago

आज भाजपचा राज्य अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. शिर्डीत आयोजित केलेल्या या अधिवेशनात आज केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन घेण्यात आलं आहे. दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून सर्व सात आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे.  

Jan 12, 2025 16:26 (IST)

विधानसभा निवडणुकीत आराजकतावादी ताकदीला निवडणुकीत पराभूत केलं- CM फडणवीस

देवेंद्र फडणवीस

लोकसभेच्या काळात संविधात विरोधीशक्तींचा प्रादुर्भाग पाहायला मिळाला. आपल्या विरोधकांनी देशात आणि राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राज्यात आपण फेक नॅरेटिव्ह पाहिलं, व्होट जिहाद पाहिलं. मात्र मागील सहा महिन्यात राष्ट्रीय विचारांच्या संघटनांनी एकत्र येत राष्ट्रवादाचं पुन्हा रोपण केलं. आराजकतावादी ताकदीला निवडणुकीत पराभूत केलं. मात्र त्यांच्या कारवाया अजून थांबलेल्या नाहीत.  

Jan 12, 2025 15:12 (IST)

Ashish Shelar: शरद पवार, उद्धव ठाकरेंना मतदारांनी उत्तर दिले: आशिष शेलार

देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदन तसंच जनतेन विश्वास ठेवला याबद्दल धन्यवाद प्रस्ताव

उद्धव ठाकरे यांचे भाषण आम्ही विसरू शकत नाही. ठाकरे म्हणाले की, देवेंद्र जी तुम्ही राहाल अथवा मी राहील. लोकसभा निकाल नंतर आता विधानसभा गुर्मी संपवू….देवेद्र जी यांनी स्वभानुसार उत्तर दिले नाही. पण मतदारांनी उत्तर दिले.  कोकणात आणि मुंबईत महायुती पराभव होणार पश्चिम महाराष्ट्रात भाजपा जिंकणार नाही म्हणत होते. मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात भाजपा विजयी झाला कोकण मुंबईत महाविकास आघाडीला नाकारलं, असे म्हणत आशिष शेलार यांनी मविआवर टीका केली. 

Jan 12, 2025 14:57 (IST)

Live Update : सौंदाना येथील सरपंचाच्या अपघात प्रकरणात गुन्हा दाखल

बीडच्या परळी तालुक्यातील सौंदाना येथील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिली होती. या अपघातात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकाला तत्काळ अटक करावी अशी मागणी ग्रामस्थ व नातेवाईकांनी केली आहे. क्षीरसागर यांचे कोणाशीही वैर नव्हते सर्वांशी मिळून मिसळून वागणारे सरपंच होते. त्यामुळे यात कुठलाही यात घातपात झाल्याचा कुठलाही संशय आम्हाला नसल्याचे देखील ग्रामस्थ व नातेवाईकांनी म्हटले आहे. दरम्यान अपघातास कारणीभूत ठरलेला टिप्पर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला असून आता याच्या चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Jan 12, 2025 14:11 (IST)

Live Update : भाजपची सत्ता आल्यावर राज्याची सुरक्षा धोक्यात - सुजात आंबेडकर

भाजपची सत्ता आल्यावर राज्याची सुरक्षा धोक्यात आली आहे. कोणत्याही राज्यात हे सरकार येणं ही धोक्याची घंटा असते हे माहितच आहे. महाराष्ट्रात हा धोका दिसतोय. विशाळगड पुन्हा सुरू व्हायला हवा. 

विशाळगडामुळे त्या परिसरातील लोकांना रोजगार आहे. अतिक्रमण म्हणून विशाळगडावरून लोकांची हकालपट्टी केली जात आहे. इतक्या वर्षांपासून गडाची देखभाल करणार्‍या लोकांसाठी सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत. 

Advertisement
Jan 12, 2025 14:05 (IST)

Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिशिंगणापूर येथे दाखल...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिशिंगणापूर येथे दाखल...

अमित शहा पहिल्यांदाच शनिशिंगणापूरात घेणार शनी देवाचे दर्शन

शनिशिंगणापूरात शनी देवाला तैलाभिषेक करून करणार महापूजा

शनी दर्शन घेतल्यानंतर शिर्डी येथील भाजपच्या महाधिवेशनाला लावणार हजेरी...

Jan 12, 2025 14:04 (IST)

Nitin Gadkari Speech Shirdi: महाराष्ट्रातील यश म्हणजे भाजपच्या इतिहासाचे सुवर्ण शिखर: नितीन गडकरी

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे आणि शिवशाही ही आमची संकल्पना आहे.

विसावे शतक अमेरिकेचे होते, आता एकविसावे शतक भारताचे आहे.  नरेंद्र मोदींजींच्या भारताला विश्वगुरु बनवायचंय आणि आत्मनिर्भर विकसनशील भारत तयार करायचा आहे. जगातली तिसरी आर्थिक व्यवस्था म्हणून पुढे न्यायचं आहे. 

महाराष्ट्राच्या निवडणुकीत जनतेने आपल्याला अभूतपूर्व यश दिले.हे या राज्यात शिवशाहीचे राज्य स्थापन टाकण्यासाठी दिले आहे. त्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर टाकली आहे.  हे यश म्हणजे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या इतिहासाचे सुवर्ण शिखर आहे मिळालेलं यश अभूतपूर्व आहे. हे यश म्हणजे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या इतिहासाचे सुवर्ण शिखर आहे.  या यशाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाचे

हे यश आहे. 

यश मिळालेल आहे पण ज्या अपेक्षेने जनतेने हे मत दिले त्या पूर्ण करण्याची जबाबदारीही आपल्यावर आहे. हा महाराष्ट्र  छत्रपती शिवरायांचा, शाहू- फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. जनतेचे कल्याण झाले पाहिजे. शिर्डीच्या या पवित्र भूमीवर साईबाबांचे स्मरण करुन विजयाच्या मिळालेल्या विश्वासातून भविष्याचा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आपल्या सर्वांना करुया. 

Advertisement
Jan 12, 2025 13:50 (IST)

Live Update : नितीन गडकरींकडून कंगना रणौत यांच्या Emergency चित्रपटाचं कौतुक

नितीन गडकरींकडून कंगना रणौत यांच्या Emergency चित्रपटाचं कौतुक

खूप चांगला चित्रपट, काल मी पाहिला - नितीन गडकरी 

Jan 12, 2025 13:47 (IST)

Live Update : बंधारा दुरूस्तीसाठी युवा सेनेचे जल समाधी आंदोलन

माळशिरस तालुक्यातील गणेशगांव येथील भीमा नदीवरील बंधार्याची दुरूस्ती करावी‌ या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने नदीपात्रातील पाण्यात आंदोलन केले. येथील बंधाऱ्याला गेल्या अनेक वर्षांपासून गळती सुरू आहे. अनेक ठिकाणी भिंतीला तडे गेले आहेत. त्यामुळे बंधाऱ्याला गळती सुरू असल्याने पाणी वाहून जात आहे. बंधाऱ्याची दुरूस्ती करावी या मागणीसाठी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली आज पाण्यात उभे राहून आंदोलन केले.‌

Advertisement
Jan 12, 2025 13:45 (IST)

Live Update : पंजाबमधील मोस्ट वॉन्टेड आरोपीला चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातून अटक

पंजाबमधील एका मोस्ट वॉन्टेड आरोपीला चंद्रपूर जिल्हयातील घुग्गुस या औद्योगिक शहरातून अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांच्या विशेष पथकाने घुग्गुस शहरात येऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. 20 वर्षीय जसप्रीत सिंग असं या अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. जसप्रीत सिंग याचावर अमृतसर येथील एका पोलीस चौकीवर हॅन्ड ग्रेनेड फेकल्याचा आरोप आहे. जसप्रीत सिंग हा फरार असतांना घुग्गुस येथे लपून बसल्याची पंजाब पोलिसांना माहिती मिळाली होती. त्याच आधारावर पंजाब पोलिसांनी ही कारवाई केली  आहे. या कारवाईत  रॉ आणि आयबी यांनीही सहभाग घेतला असल्याची माहिती आहे.

Jan 12, 2025 12:45 (IST)

Chandrashekhar Bawankule: देवेंद्रजी हे आधूनिक अभिमन्यू: चंद्रशेखर बावनकुळेंकडून कौतुक

2019 मध्ये बेईमानी करुन आपल्या पाठीत खंजीर खुपसला. देवेंद्रजींचा  अपमान आठवत आहे. ते चक्रव्यूह भेदण्याचे काम करणारे देवेंद्रजी हे आधुनिक अभिमन्यू आहेत. देवेंद्रजी वारंवार सांगत होते श्रद्धा- सबुरी ठेवा, आज ते दिसले. देवेंद्रजी सीएम झाले. हे सर्व भाजप पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे यश आहे. 

Jan 12, 2025 12:40 (IST)

Chandrapur News: तिरुपती मंदिरात दरोडा - चौकीदाराला मराहाण करून लाखोचा ऐवज लंपास

चंद्रपूर शहरालगत असलेल्या दाताळा मार्गावरील तिरुपती मंदिरात दरोडा पडल्याची धक्कादायक घटना cctv मध्ये कैद झाली आहे. मंदिरात असलेल्या चौकीदाराला दोरीने बांधून ठेवून मंदिरातील दोन्ही दानपेटी फोडून लाखो रुपये चोरून नेण्यात आले. चोरट्यांनी चौकीदाराची घडी व त्याच्या जवळ असलेले ४ हजार रुपये सुद्धा घेवून गेले. चोरी करायला आलेले सात चोरटे cctv मध्ये कैद झाले आहे. तीन दिवसापूर्वी शहरातील मुख्य मार्गांवरील तीन मोठे दुकान फोडल्याची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चंद्रपूर शहरात चोरांचा धुमाकूळ सुरू असून या बारा दिवसात चोरीची सहावी घटना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. cctv तपासत चोरांना शोधण्याचं काम सुरू केल आहे. 

Jan 12, 2025 12:27 (IST)

Pune News: पुण्यातील 2800 महिलांना मिळणार गुलाबी रिक्षा

पुणे शहरातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, नागरिकांनाही रिक्षाची चांगली सुविधा मिळावी यासाठी ‘गुलाबी इ रिक्षा’ (पिंक रिक्षा) खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे.  पुणे शहरात 2800 महिलांना रिक्षा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या योजनेची अंमलबजावणी पुणे महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार असून,महिलांनी यासाठी नाव नोंदणी करावी असे आवाहन महापालिकेच्या समाज विकास विभागाने केले आहे.

राज्य सरकारने राज्यातील सर्वच शहरांमध्ये गुलाबी इ रिक्षा योजना सुरु केली आहे.महिलांना इ रिक्षा विकत घेण्यासाठी राज्य सरकार अनुदान देणार आहे. या रिक्षाची किंमत 3 लाख 73 हजार इतकी आहे. त्यामध्ये लाभार्थी महिलेने 10 टक्के रक्कम म्हणजे 37 हजार 300 रुपये भरायचे आहेत. 

तर शासनाकडून 74 हजार 600 रुपये दिले जाणार आहेत.उर्वरित रकमेचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. त्यासाठी व्याजदर हा ९.३ + २.७५ टक्के आहे. पाच वर्षांमध्ये मासिक सहा हजार रुपयांप्रमाणे परतफेड करायची आहे. गुलाबी ई रिक्षाच्या दर तीन महिन्यांनी एक याप्रमाणे पाच वर्षांसाठी 20 दुरुस्ती सेवा मोफत दिल्या जाणार आहेत, अशी माहिती समाज विकास विभागाने दिली.

Jan 12, 2025 12:19 (IST)

BJP Adhiveshan Shirdi: भाजप अधिवेशनात सरपंच संतोष देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण

शिर्डीमध्ये आज भारतीय जनता पक्षाचे महाअधिवेशन पार पडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनाचे उद्घाटन केले.  यावेळी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, रत्न टाटा, मधुकर पिचड, झाकिर हुसैन यांच्यासह बीडचे सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

Jan 12, 2025 12:12 (IST)

Santosh Deshmukh Murder Case: मस्सजोगमधील गावकऱ्यांची बैठक अचानक रद्द; कारण अस्पष्ट

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंबंधी आज मस्सजोगमध्ये गावकऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र ही बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे.  बैठक का रद्द झाली? याबाबतचे कारण मात्र अद्याप समोर आलं नाही. 

Jan 12, 2025 11:36 (IST)

BJP Adhiveshan Shirdi: शिर्डीमधील महाअधिवेशनाला सुरुवात; CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्घाटन

शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडत आहे. आज या महाअधिवेशनाची सांगता होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे राज्यभरातील मंत्री आणि नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. 

Jan 12, 2025 11:30 (IST)

Rajmata Jijau Jayanti: राजमाता जिजाऊंची जयंती उत्साहात साजरी

हिंदवी स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचा जयंती उत्सव नाशिकच्या उमराणाणा येथे जाणता राजा मित्र मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने विविध उपक्रम  साजरा करण्यात आला. प्रारंभी राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शिवचरित्र भेट सरपंच संतोष देशमुख हत्तेचा व परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत संशयास्पद मृतू झाल्याच्या घटनेचा यावेळी निषेध करण्यात  आला. 

Jan 12, 2025 11:29 (IST)

Torres Scam Update: टोरेस कंपनीमधून 9 कोटींचा मुद्देमाल जप्त

आर्थिक गुन्हे शाखेने टोरेस प्रकरणात शनिवारपर्यंत कंपनीच्या विविध शाखांमधून सुमारे 9 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  तसेच कंपनीकडून बक्षीस स्वरुपात गाडी स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची ओळख पटविण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे.  टोरेसप्रकरणी दादरमधील कंपनीच्या शाखेत शोधाशोध राबविण्यात आली कंपनीने 15 वाहने विकत घेतल्याचे आणि 5 वाहने आरक्षित केल्याचे पुरावे या शोध मोहिमेत सापडले.

Jan 12, 2025 11:23 (IST)

Sanjay Raut: मविआ फुटली असं म्हणालो नाही: संजय राऊतांकडून स्पष्टीकरण

 मविआ फुटली असं मी कधीही म्हटलं नाही.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी  आम्ही एक भूमिका मांडत आहोत. पक्षप्रमुख सर्वांच्या भावना जाणून घेत आहेत. आघाडी विधानसभेसाठी होती, लोकसभेसाठी इंडिया आघाडी होती. भाजपसोबत असताना आम्ही एकटे लढलो. त्यांनी आमचं विधान ऐकायला हवं होतं, असं संजय राऊत म्हणालेत. 

Jan 12, 2025 10:43 (IST)

Chandrkant Khaire: उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका.... चंद्रकांत खैरे कार्यकर्त्यांसमोर नतमस्तक

उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका अशी हाक देत आणि हात जोडून विनंती करत ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे कार्यकर्त्यांसमोर नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या संत एकनाथ रंगमंदिर येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांचा शनिवारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. मात्र पक्षाला सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका असं म्हणत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले.

Jan 12, 2025 10:42 (IST)

Anil Deshmukh: तर रस्त्यावरची लढाई लढू... अनिल देशमुख यांचा अजित पवारांना इशारा

माननीय अजितदादा...

आपण जरी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा उल्लेख निवडणूक काळात केला नसेल परंतु आपलाच मित्र पक्ष भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक काळात प्रचार सभेत जाहीरपणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. 

आता सरकार म्हणून आपली सुद्धा ही जबाबदारी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस जी आमची मागणी आहे की निवडणूक काळात आपण जाहीरपणे शेतकऱ्याची कर्जमाफी करू असे बोलत होते ते आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावे. देवेंद्र फडणवीसजी आपण मुख्यमंत्री असल्यामुळे स्वतः कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकता. आपण दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर येणाऱ्या काळात रस्त्यावरची लढाई लढण्याची आमची तयारी आहे!

Jan 12, 2025 10:35 (IST)

Latur Cylinder Blast: घरगुती गॅसच्या गळतीमुळे आगीचा भडका; पाच जण होरपळले

लातूरच्या जळकोट शहरातील डांगेवाडी येथे एचपी कंपनीच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या पिनमधून गॅसची गळती झाल्याने अचानक घरात आगीचा भडका उडाल्याची घटना आहे. या दुर्घटनेत घरातील संसार उपयोगी साहित्यांसह एकूण पाच जणांनाच्या हात, पाय,चेहऱ्यावर चांगलीच दुखापत झाली आहे.. दुखापत झालेल्या सर्व लोकांना उपचारासाठी उदगीर येथे हलवण्यात आल आहे... सुदैवाने या दुर्घटनेत कसलीच मोठी हानी झालेली नाही. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आग विझवण्यात लोकांना यश आल आहे.... या घटनेची माहिती मिळताच तहसील प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा देखिल केला आहे.

Jan 12, 2025 09:53 (IST)

Bhiwandi Fire: भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात भीषण आग! 6-7 दुकाने जळून खाक

भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात भीषण आग! 6-7 दुकाने जळून खाक

आगीत फर्निचर व भंगार  गोदामाला भीषण आग 

गोदामात फर्निचर, प्लायवूड आणि प्लास्टिक वस्तूची  साठवणूक 

आगीचे कारण अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू

घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल 

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न सुरू 

घटनास्थळी स्थानिक पोलीस दाखल

Jan 12, 2025 08:24 (IST)

Solapur News: मुंबई - चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक; 10 दिवसातील दुसरी घटना

सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना ताजी असतानाच अज्ञात इसमांकडून पुन्हा मुंबई - चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. अवघ्या दहा दिवसांत अशी घटना घडल्यामुळे आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या दगडफेकीत विकलांग डब्यात बसलेल्या एका प्रवश्याला किरकोळ जखम झाली असून त्याला तात्काळ प्रथमोपचार देण्यात आले. अनिकेत लहामुने अस जखमी व्यक्तीच नाव असून तो पुणे ते कुर्डूवाडी असा प्रवास करत होता 

या दगडफेकीमध्ये मोठी हानी झालेली नसली तरी रेल्वेच्या काचा फुटल्या असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सोलापूर लोहमार्ग पोलीस करत आहेत.

Jan 12, 2025 07:46 (IST)

Badlapur News: बदलापूरच्या कीर्तन महोत्सवात 200 पखवाज वादकांची जुगलबंदी

बदलापुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात शनिवारी २०० पखवाज वादकांची जुगलबंदी पाहायला मिळाली. ही जुगलबंदी याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी वारकरी बांधवांसोवतच सर्वसामान्य बदलापूरकरांनीही मोठी गर्दी केली होती.

Jan 12, 2025 07:45 (IST)

Washim News: वाशिम जिल्ह्यातील बॅग लुटीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

वाशिम जिल्ह्यातील एक कोटींच्या बॅग लुटीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी औसा रोडवरील एका लग्नकार्यालयाच्या पार्किंगमधून ताब्यात घेतले. स्वप्नील परसराम पवार (वय 28) असे आरोपीचे नाव आहे. 9 जानेवारी रोजी हिंगोली गेट उड्डाणपूल जवळ, वाशिम येथे एका स्कुटी चालकास अडवून त्याला रॉडने मारहाण करण्यात आली. त्याच्याकडील 01 कोटी 15 लाख रुपयांची बॅग जबरदस्तीने पळवली होती. या घटनेनंतर पोलिसांच्या भीतीने आरोपी वाशिम जिल्ह्याच्या बाहेर पडला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. 

Jan 12, 2025 07:44 (IST)

Jalgaon News: जळगाव शहरात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई, 252 वाहन चालवणाऱ्या मुलांच्या पालकांवर दंडात्मक कारवाई

जळगाव शहरात वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई करत गेल्या महिन्याभरात 252 वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून या अल्पवयीन मुलांच्या पालकांकडून 17 लाख 87 हजार रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला आहे. तसेच बेशिस्त व नियम न पाळणाऱ्या 266 रिक्षा चालकांवर कारवाई करत 2 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दंडात्मक कारवाई करूनही अल्पवयीन मुलं वाहन चालवताना आढळल्यास पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

Jan 12, 2025 07:43 (IST)

Beed Accident: राखेची वाहतूक करणाऱ्या हैवाने सरपंचाला उडवले

राखेची वाहतूक करणाऱ्या हैवाने सरपंचाला उडवल्याची घटना बीडमध्ये घडली आहे.  दुचाकीवरून जात असताना अपघात झाला असून यामध्ये  सौंदाना गावच्या सरपंचाचा मृत्यू झाला.  अभिमन्यू क्षीरसागर असं मृत्यू झालेल्या सरपंचाचे नाव आहे.  मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात झाला. 

Jan 12, 2025 07:41 (IST)

Sanpada Firing: सानपाडा गोळीबार प्रकरणी संतोष गवळीला पुण्यातून अटक

सानपाडा स्टेशन जवळ डी मार्ट चौकात  ३ जानेवारीला सकाळी सव्वा दहा च्या सुमारास याच कंत्राट वादातून राजाराम टोले यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील तीन गोळ्या टोके यांना लागल्या मात्र सुदैवाने राजाराम टोके याच्या वर्मी गोळ्या न लागल्याने जीवावर बेतले नाही

गोळी झाडणारे  दुचाकीवरून आले होते. गोळीबार करून दोघेही फरार झाले होते. याच प्रकरणातील दुचाकी चालक संतोष गवळी (वय ३८ राहणार कोपरी)  याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता १४ तारखे पर्यंत पोलीस कोठडी दिली आली आहे. अशी माहिती  पोलीस सूत्रा कडून मिळतं आहे.

Jan 12, 2025 07:40 (IST)

Santosh Deshmukh Murder Case: विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही 'सीआयडी'ला मिळाला नाही

विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही 'सीआयडी'ला मिळाला नाही

फरार असताना नाशिकमध्ये मोबाइल फेकून दिला, तो कोणत्या ठिकाणी फेकला हे आठवत नसल्याचे तो 'सीआयडी'ला सांगत असल्याचे सूत्रांची माहिती 

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आतापर्यंत पाच मोबाइल जप्त 

जप्त केलेले सर्व मोबाइल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले 

विष्णू चाटेच्या मोबाईल वरूनच खंडणीची धमकी देण्यात आली होती

हत्या प्रकरणात देखील विष्णू चाटेचा मोबाईल महत्त्वाचा

Jan 12, 2025 07:39 (IST)

Bhandara News: तासभर रेल्वे फाटक बंद असल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास

भंडारा जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानक असलेल्या भंडारा रोड रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या येत असतात आणि त्यामुळे हा प्रकार आता नेहमीचाच झाला असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे. नागरिक या त्रासाला कंटाळून रेल्वे फाटक वाकून जीवघेणा प्रवास करताना मोठ्या प्रमाणात दिसून येतात. मात्र रेल्वे प्रशासनाचे वतीने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. अशात जीवघेण्या प्रवासादरम्यान येथे अपघात होणे हे दररोजचे पाहायला मिळत आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने ओव्हरब्रिज तयार करून नागरिकांना सुविधा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Jan 12, 2025 07:38 (IST)

Solapur News: गेल्या दोन महिन्यात बदलेल्या हवामानाचा जिल्ह्यातील द्राक्ष बागांना फटका

सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून सतत बदलणाऱ्या हवामानाचा फटका द्राक्ष पिकांना बसताना दिसून येतोय. शेतकऱ्यांना आपली द्राक्षाची बाग ही विविध रोगापासून वाचवण्यासाठी सतत फवारणी करावी लागतेय. वाढलेल्या फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात देखील वाढ झाली आहे. जिल्ह्यातील द्राक्ष बागांना भुरी, मिली, थ्रिप्स, दावण्या अशा विविध रोगांची लागण होत आहे. याचाच फटका शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेवरती होत आहे म्हणून शेतकऱ्यांनी द्राक्ष बाग कापून टाकले आहे.

Jan 12, 2025 07:16 (IST)

Live Blog : अंबरनाथमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी महावाचन उत्सव!

राज्य सरकारच्या वाचन पंधरवड्या अंतर्गत अंबरनाथमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी महावाचन उत्सव आयोजित करण्यात आला होता. अंबरनाथ पालिकेच्या शिवप्रेरणा ग्रंथालयाच्या माध्यमातून हा तीन दिवसीय उत्सव पार पडला.

अंबरनाथ पालिकेने चिंचपाडा परिसरात एक लाख पुस्तकांचं सुसज्ज शिवप्रेरणा ग्रंथालय उभारलं आहे. या ग्रंथालयाच्या ग्रंथपाल तपस्या नेवे यांच्या पुढाकाराने हा महावाचन उत्सव आयोजित करण्यात आला होता. यात अंबरनाथमधील 4 मराठी शाळांच्या 170 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना ग्रंथालयात आणून त्यांच्या आवडीच्या विषयांची पुस्तकं वाचण्यासाठी देण्यात आली. पुस्तकं वाचल्यानंतर त्या पुस्तकातील एखादा भाग सर्वांना वाचून दाखवण्याची आणि आपली मतं व्यक्त करण्याची संधीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. समारोपाच्या दिवशी निवेदक आणि ग्रंथपाल अमेय रानडे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि शाळा, कॉलेज झाल्यानंतरही त्यांच्या आयुष्यात पुस्तकं कायम राहावीत, या उद्देशाने हा महावाचन उत्सव आयोजित केल्याचं शिवप्रेरणा ग्रंथालयाच्या ग्रंथपाल तपस्या नेवे यांनी सांगितलं.