परभणी हिंसाचाराचा खरा सूत्रधार कोण? प्रकाश आंबेडकरांचे गंभीर आरोप; Inside स्टोरी सांगितली

मोर्च्यामध्ये काहीच गडबड नाहीय. हे नंतर येऊन त्यांनी गडबड केलेली आहे, ते कोण आहेत? पोलिसांनी हे दोन मराठे कोण आहेत ते शोधावे, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

राहुल कुलकर्णी: परभणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानस्तंभाची तोडफोड केल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा कारागृहात मृत्यू झाल्याने आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पोलिसांच्या मारहाणीत हा मृत्यू झाल्याचे गंभीर आरोप करण्यात येत असून याबाबत आता प्रकाश आंबेडकर यांनीही पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केलेत.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

दोन मराठ्यांमधील हे भांडण आहे. तिथले व्यापाऱ्यांसह सर्वांचे म्हणणे आहे की मोर्चा शांततेने निघाला. मोर्च्यामध्ये काहीच गडबड नाहीय. हे नंतर येऊन त्यांनी गडबड केलेली आहे, ते कोण आहेत? पोलिसांनी हे दोन मराठे कोण आहेत ते शोधावे. ज्यांच्यामुळे परभणीची दंगल भडकली आहे. 

त्या मोर्चामध्ये ओबीसीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. तिथे संविधानवादी जो नॉन फुले-शाहू-आंबेडकरी समूह आहे, तोही त्या मोर्च्यामध्ये होता. मोर्चा शांततेच पार पडला, असे पोलीसही मला सांगत आहेत. नंतर दगडफेक झाली, आता ही नंतर दगडफेक करणारे कोण आहेत? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मोर्चा शांततेत निघाला, काहीही गडबड नाही. अचानक गडबड कशी होते? अचानक काही होत नाही. अचानक घडवावे लागते. मग ते घडवणारे कोण आहे? सूर्यवंशी हार्ट अटॅकने गेले. तर त्यांचे पोस्टमार्टेमही व्हायचे बाकी आहे. तुम्ही मंत्री म्हणून आहात आणि बेजबाबदारपणे तुमचे वक्तव्य येतंय की ते अटॅकने गेले. म्हणून मी एक शब्द प्रयोग केला होता की अनगायडेट मिसाइल्स, या पोलीस खात्यातही आहेत का? हे शोधले पाहिजे.

Advertisement

लाठीने मारणे हे मी समजू शकतो पण रॉड वापरणे हा कोणता प्रकार आहे? आयजींनाही म्हणालो की अनगायडेट मिसाइल तुम्ही जर कंट्रोल केले नाही तर देशभरात सध्या जे राजकारण चालले आहे. पण पेरणी जी झालीय ती केवळ धर्माची झाली असती तर काही समस्या नव्हती, असे मी मानत होतो. पण धर्माच्या पेरणीसोबतच द्वेषाचीही पेरणी झालीय. आता हे पीक पिकलय आणि त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत, अशी चिंताही आंबेडकरांनी व्यक्त केली. 

एसपींना म्हटलं मी काही नावं मी तुम्हाला देणार आहे, त्यांचा शोध घ्या, ते कोणत्या पक्षाचे आहेत आणि कोणाचे पाठीराखे आहेत. 
काल आयजींनाही म्हटलंय दोन-तीन दिवसांमध्ये तुम्हालाही नावे देतो. त्यांची चौकशी करा आणि तेच असतील तर कारवाई करा. कारवाई झाली की यामध्ये कोण आहे आणि कोण नाही? 

Advertisement

(नक्की वाचा: Arthritis Symptoms And Causes : तरुणांमध्ये संधिवाताची समस्या वाढण्यामागील ही आहेत गंभीर कारणे)

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्या आरोपीबाबतही गंभीर आरोप केले. रिक्षावाल्याने मला सांगितले की त्याला कोणीतरी घेऊन आले. तो दारू प्यायलेला होता. त्याला सोडून दिले आणि एकंदरीत त्यांचे व्हर्जन असे होते की तो पुतळ्याच्या अवतीभोवती फिरला, वर चढला. त्यांच्या हातातील घटना होती ती घेतली आणि जमिनीवर आपटली.

या सगळ्या घटनेत त्याला घेऊन येणे, हा कुठेतरी सूतोवाच आहे, असे मी मानतो. त्याच्या गावातील लोक मला म्हणाली की हा काही मनोरुग्ण नाहीय. आता ज्या डॉक्टरबाईंनी त्याला मनोरुग्ण म्हणून घोषित केले, कदाचित तिचीच डिग्री तपासण्याची वेळ आता आलीय अशी परिस्थिती आहे. एकंदरीत असे आहे की त्याला दारू पाजली कोणी? यानंतर त्याला असे करायला कोणी लावले? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 

Advertisement