जाहिरात

PM Modi Meeting: देशात लॉकडाऊन लागणार का? PM मोदींनी स्पष्ट सांगितलं, सर्व मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश

केंद्र-राज्य समन्वय मजबूत ठेवणे आणि सामान्य नागरिकांवर कोणताही अतिरिक्त भार पडू न देणे, यावर बैठकीत महत्त्वपूर्ण दिशा ठरवण्यात आली.

PM Modi Meeting: देशात लॉकडाऊन लागणार का? PM मोदींनी स्पष्ट सांगितलं, सर्व मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश

PM Narendra Modi Meeting With CM:  आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या. त्याचसोबत इंधनाचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत १५ राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. जागतिक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाची तयारी, केंद्र-राज्य समन्वय मजबूत ठेवणे आणि सामान्य नागरिकांवर कोणताही अतिरिक्त भार पडू न देणे, यावर बैठकीत महत्त्वपूर्ण दिशा ठरवण्यात आली.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत लॉकडाऊनच्या अफवांवर भाष्य केले. देशात कोणतेही लॉकडाऊन लागणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केले. तसेच सर्वांनी एकसंघ होऊन काम करण्याचे आवाहन करत एकत्र काम करून देश या परिस्थितीतून यशस्वीपणे मार्ग काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आर्थिक आणि व्यापारी स्थिरता राखणे, ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे, नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे आणि पुरवठा साखळी व उद्योग मजबूत करणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

IAS Transferred: राज्यात बदल्यांचा धडाका! 8 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात मोठे बदल

पंतप्रधान मोदींनी कृषी क्षेत्रात, विशेषतः खतांच्या साठवणूक आणि वितरणावर देखरेख ठेवण्याबाबत आगाऊ नियोजनाच्या गरजेवर भर दिला. वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व स्तरांवर मजबूत समन्वयाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. सीमावर्ती आणि किनारपट्टीवरील राज्यांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले, जेणेकरून जहाजवाहतूक, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि सागरी कामकाजाशी संबंधित कोणत्याही समस्या जलद आणि सहजपणे सोडवता येतील.

अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा! 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती आणि अफवा पसरवण्याविरोधात कारवाईचा इशारा दिला आणि अचूक, विश्वसनीय माहिती प्रसारित करण्याची गरज असल्याचे सांगितले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी उचललेल्या पावलांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या आणि राज्यांना व्यावसायिक एलपीजी वाटप वाढवण्याच्या निर्णयांचेही त्यांनी स्वागत केले.

Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांचं राजकीय अस्त्र म्यान,भोंदूबाबा खरातमुळे सोडावं लागलं आणखी एक मोठं पद!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com