PM Modi's Nagpur visit : पंतप्रधान मोदींनी RSS संस्थापकांना वाहिली श्रद्धांजली, मोहन भागवतांचीही घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्यानिमित्ताने रविवारी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. त्यांचा हा दौरा अनेकार्थाने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्यानिमित्ताने रविवारी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. त्यांचा हा दौरा अनेकार्थाने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान मोदी आज अनेक कार्यक्रमात सहभागी होती. सर्वात आधी त्यांनी आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मारकावर जाऊन श्रद्धांजली अर्पण केल. पहिल्यांदाच विद्यमान पंतप्रधानांनी नागपुरातील रेशीमबागेतील संघ मुख्यालयाचा दौरा केला आहे. नागपुरमध्ये  पंतप्रधान मोदी माधव नेत्रालय रुग्णालयाची पायाभरणी करणार आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पीएम मोदींनी नागपुरात आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण केली. यादरम्यान आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित होते. पीएम मोदी जेव्हा नागपुरात बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर पोहोचले त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी त्यांचं स्वागत केलं.  

नागपुरात पोहोचलेल्या पीएम मोदींनी संरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचीही भेट घेतली. संघ आणि भाजप नेतृत्वात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यांची भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळातून पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.