Pune Crime : पुण्यात 35 कोटींच्या 100 शववाहिका धूळ खात; तानाजी सावंत यांच्या काळातील खरेदीत गोंधळ?

35 कोटींच्या खरेदीमागे काही काळंबेरं आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

समजा, तुम्ही 37 लाखांची महागडी गाडी घेतली आणि ती महिनोनमहिने तशीच न वापरता उभी ठेवली, तर? हास्यास्पद वाटेल, नाही का? पण हेच आपल्या आरोग्य विभागाने केलं आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात 35 कोटी खर्च करून तब्बल 100 शववाहिका खरेदी करण्यात आल्या. जानेवारीमध्येच पहिल्या स्लॉटच्या काही गाड्या आल्या. त्यानंतर उरलेल्या गाड्या जानेवारी महिन्यात आल्या.  पण तीन महिन्यांहून अधिक काळ पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयाजवळ मोकळ्या जागेत उभ्या आहेत. काहींच्या चाकातील हवा गेली आहे, तर काहींच्या बॅटऱ्या डाऊन झाल्या आहेत! 35 कोटींच्या खरेदीमागे काही काळंबेरं आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विशेष म्हणजे या शववाहिका अत्याधुनिक आहेत. जानेवारी महिन्यात या गाड्या आल्यानंतर त्यांचं वितरण होणं अपेक्षित होतं. या 100 गाड्या एका मैदानात पार्क करून ठेवल्या आहेत. या एका गाडीची किंमत साधारण 35 लाखांपर्यंत आहे. NDTV मराठीने घटनास्थळी जाऊन याचा आढावा घेतला. ते दृश्य पाहिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जिल्हा रुग्णालयांकडे आधीच शववाहिका असताना, नव्या गाड्यांसाठी इतका खर्च का करण्यात आला? राज्य सरकारला अजूनही या शववाहिकांचे वाटप का करता आलेले नाही?

Advertisement

नक्की वाचा - Pune Crime: अभिनेत्रीसमोर अश्लील चाळे, व्हिडीओ काढला, इंजिनिअर तरुण बाराच्या भावात गेला

तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील या खरेदीची चौकशी सुरू आहे का? 100 नव्या गाड्या धूळ खात पडल्या आहेत, त्यांचे वाटप कधी आणि कसे होणार? खरंच 100 शववाहिकांची गरज होती का? मृतदेह हलवण्यासाठी खासगी वाहनेही सहज उपलब्ध आहेत, मग ही उठाठेव कशासाठी? आणि इतकी मोठी गुंतवणूक करण्याची गरज कशासाठी असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. 35 कोटींच्या खरेदीमागे काहीतरी मोठा घोटाळा दडलेला आहे का? या प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक असल्याची मागणी केली जात आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article