Pune Accident: क्षणात सगळं संपलं! भरधाव ट्रकने चिरडलं, तरुणीने जागीच जीव सोडला; भयंकर VIDEO

पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव आरएमसी डंपरने तिला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे अंजली दुचाकीवरून खाली पडली आणि थेट ट्रकच्या चाकाखाली आली. या भीषण अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पुणे:

Pune Accident CCTV Footage:  पुण्यामध्ये एक भीषण अपघात घडला आहे.  सुसगावमध्ये आरएमसी ट्रकच्या चाकाखाली चिरडून १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तरुणी दुचाकीवरुन जात असतानाच पाठीमागुन ट्रकने धडक दिली अन् ती थेट चाकाखाली गेली. या दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला असून ट्रक चालकाला अटक केली आहे. या धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. 

पाठीमागून ट्रक आला, तरुणीला चिरडलं

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुसगाव येथे एक भीषण अपघात झाला असून, भरधाव आरएमसी  ट्रकच्या चाकाखाली चिरडून एका १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. अंजली शंकर साळवे असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Sangli News: सभापती निवडीवरुन अपहरणनाट्य! शिंदे गटाच्या सदस्याला शेतातून पळवलं? मिरजमध्ये हायहोल्टेज ड्रामा

मिळालेल्या माहितीनुसार,  सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अंजली साळवे ही आपल्या दुचाकीवरून सुस-नांदे रोडने जात होती. शिवबा चौकाजवळ आली असता, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव आरएमसी डंपरने तिला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे अंजली दुचाकीवरून खाली पडली आणि थेट ट्रकच्या चाकाखाली आली. या भीषण अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. 

चालकाला अटक 

या प्रकरणी बावधन पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ट्रक चालक राजपाल कसबे याला अटक केली आहे. केवळ चालकावरच नाही, तर सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवल्याप्रकरणी सूर्या कन्स्ट्रक्शनचे मालक गणेश कलशेट्टी यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सुसगाव परिसरात संतापाची लाट असून जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Advertisement

Nashik Crime: डॉ. मनीषा जेजुरकरांचा घातपात? महिला डॉक्टर फरार; पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलले? नव्या आरोपांनी खळबळ

Topics mentioned in this article