जाहिरात

Sangli News: सभापती निवडीवरुन अपहरणनाट्य! शिंदे गटाच्या सदस्याला शेतातून पळवलं? मिरजमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

मिरज पंचायत समिती सभापती निवडणुकीत मोठा ट्वीस्ट निर्माण झाला असून महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार?  याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Sangli News: सभापती निवडीवरुन अपहरणनाट्य! शिंदे गटाच्या सदस्याला शेतातून पळवलं? मिरजमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

शरद सातपुते, सांगली:

Miraj Panchayat Samiti Election:  राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांनंतर आता सत्ता स्थापनेसाठी मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितींवर सत्ता स्थापनेसाठी गावगाड्यांमध्ये राजकीय नाट्ये रंगताना दिसत आहेत. अशातच सांगलीच्या मिरजमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मिरज पंचायत समितीमध्ये सभापती निवडीवरून अपहरण नाट्य घडले आहे. निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या सदस्याच अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

पंचायत समिती निवडणुकीत अपहरणनाट्य! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगलीच्या मिरज पंचायत समिती सभापती निवडणुकीतून अपहरण नाट्याचा प्रकार घडला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पंचायत समिती सदस्याचं अपहरण करण्यात आल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडत आहे. 

Iran israel War: युद्धाचा भडका, अंबड, सातपुर MIDCमधील 1200 उद्योगांना फटका; गॅस तुटवड्याचा परिणाम

निवडीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शिवसेना शिंदे गटाचे बुधगाव गणातून निवडून आलेले पांडुरंग इंगळेंचे त्यांच्या शेतातून अपहरण करण्यात आल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी करत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. मिरज पंचायती समितीच्या  निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे 2 उमेदवार विजयी झाले असून सभापती निवडीत महायुतीसोबत जाण्याची भूमिका घेतली आहे.

मात्र विरोधकांकडून प्रभावाच्या भीतीने हे आपण करण्यात आल्याचा आरोप देखील शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे मिरज पंचायत समिती सभापती निवडणुकीत मोठा ट्वीस्ट निर्माण झाला असून महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार?  याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Nashik Crime: डॉ. मनीषा जेजुरकरांचा घातपात? महिला डॉक्टर फरार; पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलले? नव्या आरोपांनी खळबळ

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com